केएमटी वर्कशॉपमध्ये डिझेल चोरीचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:31 AM2021-02-27T04:31:02+5:302021-02-27T04:31:02+5:30

कोल्हापूर : केएमटी वर्कशॉपच्या वॉशिंग विभागालगतच्या सुरक्षा भिंतीवर डिझेलचे पाच कॅन संशयास्पदरित्या आढळून आले आहेत. वर्कशॉपचे गेटकिपर, एका ...

Suspicion of diesel theft in KMT workshop | केएमटी वर्कशॉपमध्ये डिझेल चोरीचा संशय

केएमटी वर्कशॉपमध्ये डिझेल चोरीचा संशय

Next

कोल्हापूर : केएमटी वर्कशॉपच्या वॉशिंग विभागालगतच्या सुरक्षा भिंतीवर डिझेलचे पाच कॅन संशयास्पदरित्या आढळून आले आहेत. वर्कशॉपचे गेटकिपर, एका चालकाच्या सतर्कतेमुळे गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्यासुमारास हा प्रकार उघडकीस आला. सापडलेले डिझेल केएमटी बस, कचरा उठाव करणारे टिपर की अन्य कोठून चोरले, याची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

महापालिकेच्या केएमटी बसचे बुद्धगार्डन येथे वर्कशॉप आहे. या ठिकाणी १०४ टिपर आणि ११० केएमटी बसेस दुरुस्तीसोबत रात्रीच्यावेळी लावल्या जातात. गुरुवारी सायंकाळी एक चालक बस लावून जात असताना येथील वॉशिंग विभागालगतच्या संरक्षक भिंतीवर संशयास्पद पाच कॅन आढळून आले. त्याने गेटकिपरला फोन वरुन माहिती दिली. याचदरम्यान त्या परिसरात बसलेले काहीजण तेथून निघून गेले. सापडलेले कॅन ताब्यात घेतले असून, त्यामध्ये २५ लिटर डिझेल आहे. हे डिझेल नेमके केएमटी बस, टिपरमधून की बाहेरुन चोरुन आणून येथे ठेवले, याबाबत नेमकी माहिती समजू शकली नाही.

प्रतिक्रिया

डिझेल सापडले ही गंभीर बाब असून, दुर्लक्ष करण्याजोगी नाही. यामुळेच प्रत्यक्ष जाऊन वर्कशॉपमध्ये पाहणी केली. हे डिझेल केएमटीचे आहे का, याची चौकशी करण्याचे आदेश वर्क्स मॅनेजरना दिले आहेत. वर्कशॉपचे क्षेत्र मोठे असल्याने येथे सुरक्षारक्षक नेमले जातील.

संदीप घारगे,

सहायक आयुक्त, महापालिका

चौकट

मग पाच कॅन आले कुठून

पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीमध्ये २५ लिटर डिझेल वकॅशॉप येथे कोण आणून ठेवणार, असा सवाल उपस्थित होत आहे. केएमटीचे डिझेल नाही, असे गृहीत जरी धरले, तर बाहेरून कोणीतरी डिझेल आणून वर्कशॉपच्या संरक्षक भिंतीवर का ठेवेल, अशी शंकाही उपस्थित होत आहे.

एका वॉचमनवर ११० बसेसचा डोलारा

वकॅशॉपचा परिसर मोठा आहे. या ठिकाणी ११० बसेस आणि १०४ टिपर लावण्यासाठी असतात. मात्र, प्रशासनाकडून केवळ एकच वॉचमन नेमला आहे. त्याला संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. अशाप्रकारची जर चोरी होत असेल, तर ती रोखण्यासाठी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे.

Web Title: Suspicion of diesel theft in KMT workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.