बनावट नोटा खपवल्याचा संशय : एनआयएचा छापा, दोघे ताब्यात; कोल्हापुरात एनआयएची धडक कारवाई

By उद्धव गोडसे | Published: December 2, 2023 09:04 PM2023-12-02T21:04:16+5:302023-12-02T21:04:23+5:30

या कारवाईबद्दल कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती.

Suspicion of using fake notes NIA raid, two detained | बनावट नोटा खपवल्याचा संशय : एनआयएचा छापा, दोघे ताब्यात; कोल्हापुरात एनआयएची धडक कारवाई

बनावट नोटा खपवल्याचा संशय : एनआयएचा छापा, दोघे ताब्यात; कोल्हापुरात एनआयएची धडक कारवाई

कोल्हापूर : बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने शुक्रवारी (दि. १) देशात विविध ठिकाणी छापे टाकले. कोल्हापुरातही एका पथकाने कारवाई करून राहुल तानाजी पाटील आणि जावेद (पूर्ण नाव उपलब्ध नाही) या संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईबद्दल कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती.

एनआयएने शनिवारी जारी केलेल्या प्रेस नोटमधील माहितीनुसार, बनावट नोटांची निर्मिती आणि त्याचा बाजारपेठेत पुरवठा होत असल्याबद्दल एनआयएकडे २४ नोव्हेंबरला तक्रार आली होती. त्या तक्रारीनुसार एनआयएच्या पथकांनी शनिवारी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटकमध्ये छापेमारी केली. कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या कारवाईत राहुल तानाजी पाटील आणि जावेद या दोघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांनी काही सिमकार्डचा वापर करून बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय एनआयएला आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. पथकांनी देशात ठिकठिकाणी केलेल्या छापेमारीत बनावट नोटा, प्रिंटर, कागद असे साहित्य जप्त केले.

कारवाईबद्दल गोपनीयता

छापेमारीबद्दल एनआयएच्या पथकांकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. स्थानिक पोलिसांकडून मदतीची मागणी केली होती. त्यानुसार स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त पुरवला. मात्र, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कारवाईबद्दल काहीच माहिती दिली नाही, असे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.

Web Title: Suspicion of using fake notes NIA raid, two detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.