शित्तूर वारुण आरोग्यवर्धिनी केंद्रात उद्या स्वॅब तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:26 AM2021-04-28T04:26:51+5:302021-04-28T04:26:51+5:30

जास्तीत जास्त नागरिकांनी स्वॅब तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन सतीश नांगरे : लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर वारुण : कोरोनाचा संसर्ग ...

Swab check tomorrow at Shittur Varun Arogyawardhini Center | शित्तूर वारुण आरोग्यवर्धिनी केंद्रात उद्या स्वॅब तपासणी

शित्तूर वारुण आरोग्यवर्धिनी केंद्रात उद्या स्वॅब तपासणी

Next

जास्तीत जास्त नागरिकांनी स्वॅब तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन

सतीश नांगरे :

लोकमत न्यूज नेटवर्क

शित्तूर वारुण :

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्यामुळे शित्तूर-वारुण येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात स्वॅब तपासणी करण्यात यावी. या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने (दि. १९) रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत दर गुरुवारी शित्तूर-वारुण येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात स्वॅब तपासणी करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. निरंकारी यांनी सांगितले.

शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरामध्ये बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे व या परिसरात स्वॅब तपासणी केंद्र जवळपास कुठेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. कोरोना संसर्ग वाढण्याला ही बाब कारणीभूत ठरू नये. यासाठी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.

शित्तूर-वारुण परिसरातील या आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत येत असलेली १३ गावे व वाड्या-वस्त्यांमध्ये बाहेरून आलेले नागरिक, सुपर स्प्रेडरमध्ये समावेश असलेले भाजी विक्रेते, दुकानदार, दूध संस्था, बँकिंग कर्मचारी, ज्यांना सर्दी, खोकला, ताप असा त्रास आहे व ज्यांचा पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क आला आहे. अशा सर्वांनी रॅपिड अँटीजेन व आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्या करून घ्याव्यात, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. निरंकारी यांनी यावेळी केले.

Web Title: Swab check tomorrow at Shittur Varun Arogyawardhini Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.