सीपीआरमधील स्वॅब संकलन, लसीकरणाला ब्रेक भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:54 AM2021-09-02T04:54:03+5:302021-09-02T04:54:03+5:30

सीपीआरमध्ये केवळ १६ स्वॅबचे संकलन सीपीआरमधून रोज किमान १०० ते १२५ नागरिकांच्या स्वॅबचे संकलन करून ते शेंडा पार्क येथील ...

Swab collection in CPR, break to vaccination part 2 | सीपीआरमधील स्वॅब संकलन, लसीकरणाला ब्रेक भाग २

सीपीआरमधील स्वॅब संकलन, लसीकरणाला ब्रेक भाग २

Next

सीपीआरमध्ये केवळ १६ स्वॅबचे संकलन

सीपीआरमधून रोज किमान १०० ते १२५ नागरिकांच्या स्वॅबचे संकलन करून ते शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत पाठवले जाते. परंतु बुधवारी दिवसभरात केवळ १६ नागरिकांचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

चौकट

लसीकरण केंद्रावर वादावादी

सीपीआरमधील लसीकरण केंद्रावर ज्यांचे मंगळवारी लसीकरण झाले नव्हते, असे नागरिक बुधवारी पुन्हा आले. परंतु या ठिकाणी शिकाऊ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना सराईतपणे नागरिकांची माहिती ॲपवरून भरणे शक्य न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. अखेर सुरक्षारक्षक आल्यानंतर नागरिकांची समजूत घालण्यात आली. त्यानंतर लसीकरण बंद करण्यात आले.

चौकट

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्याची गरज

कंत्राटी पध्दतीने सीपीआरमध्ये सध्या १०३ कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वर्ग ४ चे ४७ कर्मचारी असे एकूण १०३ कर्मचारी कार्यरत होते. परंतु या सर्वांची सेवा खंडित करण्यात आल्याने सीपीआरसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आली नसताना, आणि तिसऱ्या लाटेचा धोका असताना, हे मनुष्यबळ पुन्हा मंजूर व्हावे, असे पत्र अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी वैद्यकीय संचालकांना पाठवले आहे.

चौकट

हा आहे पर्याय

सध्या आरोग्य विभागाने कंत्राटी कर्मचारी पुरवठा करण्यासाठी राज्यासाठी एकच एजन्सी नेमली आहे. त्याच एजन्सीने नव्याने भरती न करता याच कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतल्यास पुन्हा स्वॅब संकलन आणि लसीकरण कामास गती येणार आहे. अन्यथा या प्रक्रिया संथ होण्याची भीती आहे.

Web Title: Swab collection in CPR, break to vaccination part 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.