स्वाभिमान शेतकरी संघटना दुकानदारांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 12:18 PM2021-07-12T12:18:49+5:302021-07-12T12:22:01+5:30

Ichlkarnji Raju Shtty Kolhapur : जो कायद्याचा आदर करतो त्याला भीती दाखवली जात आहे आणि निर्बंध जुगारून निवडणूका, मिटींग व बैठका घेतल्या जातात त्याच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. त्यामुळे जो दुकानदार दुकाने उघडणार त्याच्या पाठीशी स्वाभिमान शेतकरी संघटना राहणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

Swabhiman Shetkari Sanghatana with the support of shopkeepers | स्वाभिमान शेतकरी संघटना दुकानदारांच्या पाठीशी

स्वाभिमान शेतकरी संघटना दुकानदारांच्या पाठीशी

googlenewsNext
ठळक मुद्देस्वाभिमान शेतकरी संघटना दुकानदारांच्या पाठीशीमाजी खासदार राजू शेट्टी इचलकरंजीत आंदोलन

इचलकरंजी : जो कायद्याचा आदर करतो त्याला भीती दाखवली जात आहे आणि निर्बंध जुगारून निवडणूका, मिटींग व बैठका घेतल्या जातात त्याच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. त्यामुळे जो दुकानदार दुकाने उघडणार त्याच्या पाठीशी स्वाभिमान शेतकरी संघटना राहणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवासह इतर व्यवसाय सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना येथील के.एल.मलाबादे चौकात प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरली. बघताय काय सामील व्हा, व्यवसाय आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे , आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शेट्टी म्हणाले, कोल्हापुरात शहरास पालकमंत्री सतेज पाटील यांनी आठ दिवसासाठी दुकाने उघडण्यास परवानगी दिली. परंतु इचलकरंजीला नाकारण्यात आले. या विरोधात इचलकरंजीत सोमवारी आंदोलन करण्याचा शब्द मी पाळला असल्याचे सांगितले. यावेळी शहर अध्यक्ष रामदास कोळी, विकास चौगले, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Swabhiman Shetkari Sanghatana with the support of shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.