‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्याचे तेंडुलकराच्या निवासस्थानासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:42+5:302021-02-09T04:25:42+5:30

काेल्हापूर : पंढरपूरचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रणजित बागल यांनी सचिन तेंडुलकर यांच्या मुंबईतील निवासस्थानांसमोर शांततेत आंदोलन केले. ‘सचिन ...

Swabhimani activist protests in front of Tendulkar's residence | ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्याचे तेंडुलकराच्या निवासस्थानासमोर आंदोलन

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्याचे तेंडुलकराच्या निवासस्थानासमोर आंदोलन

Next

काेल्हापूर : पंढरपूरचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रणजित बागल यांनी सचिन तेंडुलकर यांच्या मुंबईतील निवासस्थानांसमोर शांततेत आंदोलन केले. ‘सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील का’ असा सवाल करत दिल्लीतील आंदोलनाबाबत तेंडुलकरने केलेल्या ट्विटचा निषेध केला.

केंद्राने तीनही कृषी कायदे रद्द करावेत यासाठी शेतकरी दिल्लीत तळ ठोकून आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला जोरदार विरोध केला. संघटनेचे नेते राजू शेट्टी कृषी कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी दौरे करून शेतकऱ्यांत जागृती करत आहेत. संघटनेचे युवा प्रवक्ते रणजित बागल यांनी सोमवारी मुंबईत सचिन तेंडुलकरच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. कोणत्याही प्रकारच्या घोषणा न करता केवळ ‘सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील का’ असा फलक घेऊन त्यांनी शांततेत आंदोलन केले. बागल हे मूळचे पंढरपूर येथील आहेत.

फोटो ओळी : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील निवासस्थानासमोर सोमवारी स्वाभिमानीचे युवा प्रवक्ते रणजित बागल यांनी आंदोलन केले. (फोटो-०८०२२०२१-कोल-स्वाभिमानी)

Web Title: Swabhimani activist protests in front of Tendulkar's residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.