स्वाभिमानी आंदोलन बातमी जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:29 AM2021-09-06T04:29:25+5:302021-09-06T04:29:25+5:30
स्वाभिमानीचा ऊर भरून येणारी गर्दी पाहून सरकारला सर्दी नक्कीच येणार, अशी टीका स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी केली. लोकांचा ...
स्वाभिमानीचा ऊर भरून येणारी गर्दी पाहून सरकारला सर्दी नक्कीच येणार, अशी टीका स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी केली. लोकांचा महापूर फक्त राजू शेट्टी हेच आणू शकतात, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. त्यामुळे शेट्टी हेच काल, आज आणि उद्याही शेतकऱ्यांचे नेते राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सावकर मादनाईक यांनीही एवढ्या मोठ्या संख्येने येऊन चळवळीवर विश्वास दाखवल्याबद्दल शेतकऱ्यांना सलाम केला व आभारही मानले.
प्रचंड जल्लोष आणि हुल्लडबाजीही
एकसारखी वाजणारी हलगी, डफ आणि टाळ, घुमणारे ढोल, फुटणाऱ्या फटाक्याच्या माळा, दिल्या जाणाऱ्या घोषणा आणि स्वागतासाठी उधळली जाणारी फुले, पायावर घातले जाणारे पाणी असा उत्साह पाहता आक्राेश कमी आणि जल्लोष जास्त दिसत होता. अक्षरश: फटाके लावून, शिट्ट्या वाजवत संगीताच्या तालावर युवक थिरकत होते. हुल्लडबाजीमुळे पोलिसांचा प्रसादही अनेकांना खावा लागला.
प्रयाग चिखलीपासून पदयात्रेला सुरुवात झाल्यापासून मार्गावर महिलांनी शेट्टी यांचे औक्षण करून कपाळाला कुंकू लावले. पाच दिवस सातत्याने कुंकू लावून जखमही झाली आहे. पण या जखमेचे दु:ख नाही, जखम कधीही भरुन येईल, पण हे भाग्य मला लाभले याचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी आभार व्यक्त केले.
मागण्या
२०१९ च्या धर्ती विनाअट कर्जमाफी करा
पूरग्रस्तांच्या मागणीप्रमाणे सोईचे पुनर्वसन करा
कृष्णा- पंचगंगा नदी मार्गावर असलेल्या पुलाचा भराव कमी करून कमानीचे पूल बांधा
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची सरसकट शैक्षणिक फी व कर्जमाफी करा
पुराच्या अभ्यासासाठी अभ्यासगट नेमावा
कृषिपंपाचे पंचनामे करा, यंत्रमागधारकांना नुकसानभरपाई द्या
पुराचे पाणी जाणाऱ्या सर्व गावांना पूरग्रस्त जाहीर करून अनुदान द्या