'स्वाभिमानी' आज कारखान्यांच्या अध्यक्षांना खर्डा-भाकरी देणार, १५ नोव्हेंबरला आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:14 PM2023-11-10T12:14:27+5:302023-11-10T12:14:51+5:30
जयसिंगपूर : अद्याप शासनाने काही लक्ष घातलेले नाही. कारखानदारांनी स्वारस्य दाखविलेले नाही. काही कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेतकऱ्यांनी ...
जयसिंगपूर : अद्याप शासनाने काही लक्ष घातलेले नाही. कारखानदारांनी स्वारस्य दाखविलेले नाही. काही कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शेतकऱ्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे आज, शुक्रवार (दि.१०) पासून चार दिवस कांदा, खर्डा-भाकर घेऊन कारखान्यांच्या अध्यक्षांना दिली जाणार आहे.
गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला एफआरपीशिवाय चारशे रुपये जास्त मिळावेत, चालू हंगामातील उसाला एकरकमी ३५०० रुपये उचल मिळाल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. २२ व्या ऊस परिषदेनंतर मंगळवार (दि. ७) पासून माजी खासदार शेट्टी यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह जयसिंगपूर विक्रमसिंह क्रीडांगणावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, निमशिरगाव येथून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पायी दिंडी काढून आंदोलनस्थळी माजी खासदार शेट्टी यांना भेट दिली. यावेळी सागर मादनाईक, बंडू पाटील, राम शिंदे, सुभाष शेट्टी, शैलेश आडके, स्वस्तिक पाटील, योगेश जिवाजे, राजू कुपवाडे, राजू बुराण यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते. १५ नोव्हेंबरला आंदोलनाची पुढील दिशा स्वाभिमानी जाहीर करणार आहे.