‘स्वाभिमानीचा मोर्चा म्हणजे बनवेगिरीचा कळस’

By admin | Published: May 7, 2017 04:26 AM2017-05-07T04:26:28+5:302017-05-07T04:26:28+5:30

सरकारविरोधातील मोर्चात जर मंत्रीच उतरत असतील तर आता महाराष्ट्रातील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल

'Swabhimani's Front is the Begumpari Pillar' | ‘स्वाभिमानीचा मोर्चा म्हणजे बनवेगिरीचा कळस’

‘स्वाभिमानीचा मोर्चा म्हणजे बनवेगिरीचा कळस’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सरकारविरोधातील मोर्चात जर मंत्रीच उतरत असतील तर आता महाराष्ट्रातील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल करीत ‘स्वाभिमानी’चा मोर्चा आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सहभाग म्हणजे बनवेगिरीचा कळस झाला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्यांना शेतकरीच मातीत घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.
कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी सरकारसह ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेवर आसूड ओढले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सर्वजण कर्जमाफीची मागणी करतात. या पक्षांचे सभागृहात स्पष्ट बहुमत असताना या मंडळींची सभागृहाबाहेर ‘नौटंकी’ सुरू आहे. सरकारविरोधातील मोर्चात राज्यमंत्री उतरतात आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे म्हणजे देवेंद्रजी, अजब तुमचे सरकार आणि धन्य धन्य ते मुख्यमंत्री, असेच म्हणावे लागेल, असेही ते म्हणाले.

अस्थिकलश यात्रा

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा अस्थिकलश घेऊन मंत्रालयावर धडक मारण्यासाठी साखराळे (जि. सांगली) येथील विजय जाधव हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शनिवारी कोल्हापुरातून रवाना झाले. या यात्रेची दखल सरकारने घेतली नाही तर महाराष्ट्रातील ‘भोगी सरकार’ विरोधात उत्तर प्रदेशच्या ‘योगी सरकार’कडे दाद मागण्यासाठी तिथेपर्यंत यात्रा करण्याचा निर्धार जाधव यांनी केला.

Web Title: 'Swabhimani's Front is the Begumpari Pillar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.