पंचगंगा घाटावर ‘स्वच्छ भारत अभियान’

By admin | Published: December 25, 2014 11:26 PM2014-12-25T23:26:30+5:302014-12-26T00:03:33+5:30

वाजपेयी यांचा वाढदिवस : जिल्हा भाजपतर्फे आयोजन; महापालिकेच्या यंत्रणेचा सहभाग

'Swachh Bharat Abhiyan' on Panchaganga Ghat | पंचगंगा घाटावर ‘स्वच्छ भारत अभियान’

पंचगंगा घाटावर ‘स्वच्छ भारत अभियान’

Next

कोल्हापूर : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त आज, गुरुवारी कोल्हापुरातील पंचगंगा घाट नदी परिसरात जिल्हा भारतीय जनता पक्षाच्यावतीने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात आले. या अभियानात महापालिकेची यंत्रणा मनुष्यबळ, वाहन व स्वच्छता अवजारे यांच्यासह सहभागी झाली होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, वाजपेयी यांचा वाढदिवस खऱ्या अर्थान सकारात्मक कृतीद्वारे आपण साजरा केला आहे. त्यांना केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंचगंगा घाट सुशोभित करणे, पंचगंगेचे वैभव पुन्हा उभारणे, त्याचप्रमाणे साबरमतीच्या धर्तीवर पंचगंगा नदीघाट सुशोभित करणे व अत्यंत चांगल्या प्रतीची सुविधा असणारी व्यवस्था घाटावर निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी आणण्याचा प्रयत्न करू.
याठिकाणी साचलेला कचरा, प्लास्टिक, दगड, खरमाती, निर्माल्य, गवत, तण, आदी प्रकारचा कचरा डंपरमधून हलविण्यात आला. अभियानात नगरसेवक महेश जाधव, आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, नगरसेविका प्रभा टिपुगडे, प्रदेश सदस्य अ‍ॅड. संपतराव पवार, सरचिटणीस संतोष भिवटे, राहुल चिकोडे, युवा अध्यक्ष संदीप देसाई, विजय जाधव, सुरेश जरग, हेमंत आराध्ये, विजय गायकवाड, हर्षद कुंभोजकर, किरण कुलकर्णी, श्रीकांत घुंटे, दिलीप मैत्राणी, अमोल पालोजी, मामा कोळवणकर, अशोक लोहार, उमेश निरंकारी, तौफिक बागवान, अनिल काटकर, सुनील टिपुगडे, नितीन निकम, पपेश भोसले यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
पंचगंगा नदीघाट येथील स्वच्छ भारत अभियानात कोल्हापूर महापालिकेचे सुमारे दोनशे कर्मचारी, दोन जे. सी. बी., दोन डंपर, आदी मनुष्यबळ व यंत्रसामग्री होती. या अभियानात विभागीय आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, तानाजी पाडळकर, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, स्वप्निल उलपे, मुनीर फरास, राजगोळकर, आदींचा सहभाग होता.

Web Title: 'Swachh Bharat Abhiyan' on Panchaganga Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.