स्वामी विवेकानंद पतसंस्थेला १ कोटी ११ लाख ४५ हजारांचा निव्वळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:46 AM2021-03-04T04:46:00+5:302021-03-04T04:46:00+5:30
संस्थेच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा निव्वळ नफा १ कोटीपेक्षा अधिक झाला आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल २ कोटी ६६ लाख ४६ ...
संस्थेच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा निव्वळ नफा १ कोटीपेक्षा अधिक झाला आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल २ कोटी ६६ लाख ४६ हजारांचे असून ठेवी ९८ कोटी ६८ लाख ३८ हजारांच्या आहेत.
संस्थेचा १७० कोटी ५७ लाखांचा व्यवसाय असून ११४ कोटी २० लाखांचे खेळते भांडवल आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी १२५ कोटी व १०० कोटींची कर्ज व एकूण व्यवसाय २२५ कोटी करणेचे ध्येय असल्याचे जनार्दन टोपले यांनी सांगितले. . जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार यांनी सभा नोटीस वाचन, अहवाल, ताळेबंद, नफातोटा, अंदाजपत्रक व लेखापरीक्षण अहवालाचे वाचन केले. संस्थापक महादेव टोपले, संचालक नारायण सावंत, मलिककुमार बुरूड, रवींद्र दामले, रामचंद्र पाटील, महेश नार्वेकर, सुधीर कुंभार, सुरेश कुंभार, संजय घंटे, राजेंद्र चंदनवाले, प्रेमा सुतार, माधवी कारेकर, तुकाराम कोटकर उपस्थित होते. उपाध्यक्ष दयानंद भुसार यांनी आभार मानले.
----------------------------------
* फोटो ओळी : स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष जनार्दन टोपले. शेजारी रवींद्र दामले, दयानंद भुसारी, सुधीर कुंभार आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०३०३२०२१-गड-०३