स्वामी विवेकानंद आध्यत्मिक केंद्रातर्फे चित्रकला स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 05:14 PM2020-01-11T17:14:02+5:302020-01-11T17:14:12+5:30
कोल्हापूर येथील साठमारी परिसरातील श्री स्वामी विवेकानंद आश्रम आध्यात्मिक केंद्राच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता ५वी ते ७ वी आणि ८ वी ते १०वी या गटांत या स्पर्धा घेण्यात आल्या. श्री स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धा घेण्यात आल्या.
कोल्हापूर : येथील साठमारी परिसरातील श्री स्वामी विवेकानंद आश्रम आध्यात्मिक केंद्राच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता ५वी ते ७ वी आणि ८ वी ते १०वी या गटांत या स्पर्धा घेण्यात आल्या. श्री स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धा घेण्यात आल्या.
आध्यात्मिक केंद्राच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या स्पर्धेच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पायमल यांच्या हस्ते श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पायमल यांनी, सुदृढ शरीराच्या सहायाने स्वत:ची व देशाची उन्नत्ती करा, असे मार्गदर्शन करीत भविष्यात कलेचे महत्त्व आणि करियर संदर्भात माहिती देऊन विद्यार्थी व पालकांना केंद्राच्या आध्यात्मिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.‘सामर्थ्य हे जीवन तर दुर्बलता हा मृत्यू’ या स्वामीजींच्या उद्बोधक वाक्याचा अर्थ विश्वस्त मनोहर साळोखे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
यावेळी केंद्राचे सचिव चंद्रकांत देसाई, विश्वस्त सर्जेराव जरग, सेवाभावी सदस्य अमर साळोखे, विश्वस्त, सदस्य, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध पैलूंचे चित्रण विद्यार्थ्यांनी कागदावर उमटविले होते. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे संयोजन कार्यवाह कलाशिक्षक संजय सोनार यांनी केले होते.