मंत्री मुश्रीफ यांच्या आश्वासनानंतर स्वामींचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:24 AM2021-02-13T04:24:24+5:302021-02-13T04:24:24+5:30
धार्मिक स्थळाकडे जाणारा रस्ता आणि भक्त निवासाचे अपूर्ण काम पूर्ण व्हावे, या मागणीसाठी स्वामी गेले पाच दिवस उपोषणास बसले ...
धार्मिक स्थळाकडे जाणारा रस्ता आणि भक्त निवासाचे अपूर्ण काम पूर्ण व्हावे, या मागणीसाठी स्वामी गेले पाच दिवस उपोषणास बसले होते. त्यांच्या आंदोलनाला पाचव्या दिवशी यश आले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधीत विभागांना सूचना करून कामाचा अहवाल पाठविण्याचा आदेश दिल्यानंतर बांधकाम विभागाचे उपअभियंता एम. डी. क्षीरसागर व एन. के. कांबळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिले व उपोषण स्थगित करण्याची मागणी केली. त्यानुसार बसवकुमार स्वामी यांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी अण्णासाहेब शहापुरे, नीलकंठ मुगळखोड, दिगंबर सकट, सुरेश शेटे, पंकज बुढ्ढे, आनंदा माळी, महालिंग कोरे, बापू माळी, मधुकर महाजन, बाळासाहेब तोडकर उपस्थित होते.