आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू स्वप्निल पाटीलचे जल्लोषी स्वागत; पंतप्रधानांकडून विशेष कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 06:04 PM2018-10-17T18:04:16+5:302018-10-17T18:06:35+5:30

जकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या पॅरा एशियन गेम्समध्ये कोल्हापूरचा गोल्डनबॉय पॅरा जलतरणपटू स्वप्निल संजय पाटील याने एक रौप्य व दोन कांस्य पदकांची कमाई केली. या कामगिरीनंतर तो प्रथमच करवीरनगरीत बुधवारी दाखल झाला. त्याचे दसरा चौक येथे आमदार सुजीत मिणचेकर यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Swapnil Patil welcomes international para swimmer; Special appreciation from the Prime Minister | आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू स्वप्निल पाटीलचे जल्लोषी स्वागत; पंतप्रधानांकडून विशेष कौतुक

जकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या पॅरा एशियन गेम्समध्ये जलतरण स्पर्धेत एक रौप्य व दोन कांस्यपदक मिळवणाºया कोल्हापूरचा गोल्डन बॉय पॅरा जलतरणपटू स्वप्निल पाटील याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील निवासस्थानी विशेष कौतुक केले.

googlenewsNext
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू स्वप्निल पाटीलचे जल्लोषी स्वागत; पंतप्रधानांकडून विशेष कौतुकजकार्ता येथे झालेल्या पॅरा एशियन गेम्समध्ये एक रौप्य, दोन कांस्यची कमाई

कोल्हापूर : जकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या पॅरा एशियन गेम्समध्ये कोल्हापूरचा गोल्डनबॉय पॅरा जलतरणपटू स्वप्निल संजय पाटील याने एक रौप्य व दोन कांस्य पदकांची कमाई केली. या कामगिरीनंतर तो प्रथमच करवीरनगरीत बुधवारी दाखल झाला. त्याचे दसरा चौक येथे आमदार सुजीत मिणचेकर यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

स्वप्निलने पॅरा आशियाई स्पर्धेत प्रथमच सहभाग नोंदवत ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, तर ४०० मीटर फ्रीस्टाईल व १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदकांची कमाई करीत देशासाठी एकूण तीन पदके मिळवली. यासह त्याने ४ बाय १०० रिलेमध्ये चौथा क्रमांक पटकाविला. आशिया खंडातून या स्पर्धेसाठी ४८ देश सहभागी झाले होते.

पॅरालिम्पिक कमिटी आॅफ इंडियातर्फे भारतातून १९४ जणांचे सर्व खेळ प्रकारासाठी पथक गेले होते. यात १९ पॅरा जलतरणपटू होते त्यांपैकी एक कोल्हापूरचा स्वप्निल होता. त्याने एक रौप्य व दोन कांस्य पदकांची कमाई केली. या कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे खास दिल्ली येथील निवासस्थानी त्याचे विशेष कौतुक केले.

या कामगिरीनंतर तो प्रथमच बुधवारी सायंकाळी पाच वाजता करवीर नगरीत दाखल झाला. त्याचे स्वागत करवीरवासियांतर्फे आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांनी केले. यावेळी पी. जी. टी.चे विश्वस्त विरेंद्र घाटगे, कोल्हापूर जिल्हा पॅरालिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आकाश कोरगावकर, अमोल कोरगावकर, अनिल पोवार, आर. डी. आरळेकर, निसार मोमीन, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, वस्ताद मुकुंद करजगार, संजय पाटील, चेतन पाटील, अजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. त्याची दसरा चौक, गोखले कॉलेज- शास्त्रीनगर येथील त्याच्या राहत्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.


जकार्ता येथील पॅरा एशियन गेम्समध्ये काही अंशांनी माझे सुवर्ण हुकले आहे. त्याची कसर येणाऱ्या २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये पात्र ठरून भरून काढण्याचा इरादा आहे.
- स्वप्निल पाटील,
आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरणपटू

 

Web Title: Swapnil Patil welcomes international para swimmer; Special appreciation from the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.