शिवाजी विद्यापीठातील ३० प्राध्यापकांना पदोन्नतीची गोड भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:12 PM2019-01-16T18:12:08+5:302019-01-16T18:13:42+5:30
शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमधील ३० प्राध्यापकांना प्रशासनाने मंगळवारी पदोन्नतीची पत्रे दिली. करिअर अॅडव्हान्समेंट स्कीमअंतर्गत (कॅस) प्रशासनाकडून पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. मकरसंक्रांतीच्या दिवशी पदोन्नतीची गोड भेट मिळाल्याने प्राध्यापकांतून आनंद व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमधील ३० प्राध्यापकांना प्रशासनाने मंगळवारी पदोन्नतीची पत्रे दिली. करिअर अॅडव्हान्समेंट स्कीमअंतर्गत (कॅस) प्रशासनाकडून पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. मकरसंक्रांतीच्या दिवशी पदोन्नतीची गोड भेट मिळाल्याने प्राध्यापकांतून आनंद व्यक्त होत आहे.
महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवरील प्राध्यापकांच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने कार्यवाही कॅसद्वारे केली जाते. विद्यापीठातील विविध अधिविभागांमधील प्राध्यापकांच्या कॅसअंतर्गत पदोन्नतीची प्रकरणे प्रलंबित होती. पदोन्नतीसाठी पात्र प्राध्यापकांच्या मुलाखतीची प्रक्रिया गेल्या १५ दिवसांपासून प्रशासनातर्फे सुरू होती.
ती पूर्ण झाल्याने मंगळवारी प्रशासनाने ३0 प्राध्यापकांना पदोन्नतीची पत्रे दिली. सन २०१३ मध्ये प्रशासनाने २५ प्राध्यापकांना पदोन्नती दिली होती. त्यानंतर सहा वर्षांनी यंदा प्रशासनाकडून प्राध्यापकांना पदोन्नती देण्यात आली. त्यामध्ये साहाय्यक, सहयोगी प्राध्यापकांचा समावेश आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल बंद होता.