जलतरण स्पर्धेत कोल्हापूरला ४० सुवर्ण
By admin | Published: June 13, 2015 12:02 AM2015-06-13T00:02:57+5:302015-06-13T00:12:39+5:30
जलतरणपटूंनी ४० सुवर्ण, ३१ रौप्य, तर १८ कांस्यपदकांची कमाई करीत उपविजेतेपद पटकावले.
कोल्हापूर : नाशिक येथे झालेल्या ४२ व्या ज्युनिअर व ३२ व्या सबज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंनी ४० सुवर्ण, ३१ रौप्य, तर १८ कांस्यपदकांची कमाई करीत उपविजेतेपद पटकावले.
स्पर्धेत हर्षवर्धन नाईकने आठ सुवर्णपदके जिंकून चॅम्पियनशिप प्राप्त केली. तर मुलींमध्ये युगंधरा शिर्के हिने व सबज्युनिअर गटात अभा देशपांडे हिने मुलींची चॅम्पियनशिप पटकावली. कोल्हापुरातील पदक प्राप्त खेळाडूंमध्ये राजवर्धन नाईक, हर्षवर्धन नाईक, संदेश मालवणकर, प्रज्ज्वल कोल्हापुरे, अवधूत परुळेकर, करण धर्माधिकारी, सिद्धांत पत्की, सुजल पाटील, वैभव लाड, प्रेम पोवार, झिशान मैनदर्गी, कौशिक मलांडकर, आदित्य देसाई, प्रथमेश मोरे, विपुल जाधव, पृथ्वीराज डांगे, पार्थ येसरे, सौरभ पाटील, प्रणव ढगे, सूर्याजी बोडके यांचा समावेश होता
मुलींमध्ये युगंधरा शिर्के, अभा देशपांडे, हर्षदा जाधव, सुबिया मुल्लाणी, दिशा वधवानी, इफिया इल्कावाले, अनुष्का पाटील, अहिल्या चव्हाण, अश्मी देसाई, प्रिशा पवार, वैष्णवी पाटील, अस्मिता म्हाकवे, इंदिरा परमेकर, नम्रता घाग, लावण्या नलवडे, सुहानी घाटगे यांचा समावेश होता.
या खेळाडूंची बालेवाडी (पुणे) येथे १३ ते १८ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, सचिव अॅड. किरण पाटील, सुशील पाटील, अजय पाठक, प्रशिक्षक श्रीकांत जांभळे, प्रभाकर डांगे, संदीप पाटील, अर्जुन मगदूम, अमर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (क्रीडा प्रतिनिधी)