स्वीमिंग फेडरेशनच्या निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली होणार जलतरण स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:33 AM2019-05-16T10:33:53+5:302019-05-16T10:36:00+5:30
स्वीमिंग फेडरेशन आॅफ महाराष्ट्राचे (एसएफआय) तीन निरीक्षक आणि विक्रम खाडे यांच्या निरीक्षणाखाली कोल्हापूरमध्ये जलतरण निवड चाचणी स्पर्धा होईल. इचलकरंजी येथे शनिवारी (दि. १८) स्पर्धा घेण्यात येणार आहे. खेळाडूंचे नुकसान होऊ देणार नाही, असे एसएफआयचे निमंत्रक किशोर शेट्टी यांनी बुधवारी सांगितले. त्यामुळे या दोन्ही संघटनांतील वादावर मार्ग निघाला आहे.
कोल्हापूर : स्वीमिंग फेडरेशन आॅफ महाराष्ट्राचे (एसएफआय) तीन निरीक्षक आणि विक्रम खाडे यांच्या निरीक्षणाखाली कोल्हापूरमध्ये जलतरण निवड चाचणी स्पर्धा होईल. इचलकरंजी येथे शनिवारी (दि. १८) स्पर्धा घेण्यात येणार आहे. खेळाडूंचे नुकसान होऊ देणार नाही, असे एसएफआयचे निमंत्रक किशोर शेट्टी यांनी बुधवारी सांगितले. त्यामुळे या दोन्ही संघटनांतील वादावर मार्ग निघाला आहे.
मान्यता नसल्याने आणि खेळाडूंच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोन्ही संघटनांच्या जलतरण निवड चाचणी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोल्हापूरमधील विविध जलतरण तलावांवरील खेळाडूंच्या पालकांनी मंगळवारी (दि. १४) घेतला. ह्यएसएफआयह्णने प्रतिनिधी पाठवून इचलकरंजीऐवजी कोल्हापूर शहरामध्ये स्पर्धा घ्यावी; अन्यथा ज्या ठिकाणी स्पर्धा होईल, ती बंद पाडण्याचा इशारा या पालकांनी दिला आहे. त्याबाबत एसएफआयचे निमंत्रक किशोर शेट्टी यांनी सांगितले की, कोल्हापूरमधील दोन्ही संघटनांबाबत पालकांच्या तक्रारी आहेत. यांतील काही पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटून या तक्रारींची माहिती दिली.
मंत्री तावडे यांनी या पालकांची समस्या सोडविण्यास दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानुसार या पालकांना मी भेटलो. यावेळी पालकांनी एसएफआयने कोल्हापुरात निवड चाचणी घेण्याची मागणी केली. तिची माहिती एसएफआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत दिली. त्यांच्या मान्यतेनुसार आता ह्यएसएफआयह्णचे तीन निरीक्षक आणि विक्रम खाडे यांच्या निरीक्षणाखाली इचलकरंजीमध्ये निवड चाचणी घेतली जाणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनात पारदर्शकता राहील. कोणत्याही खेळाडूचे नुकसान होऊ देणार नाही. या स्पर्धेच्या आयोजनाबाबत विक्रम खाडे यांना ई-मेल पाठविणार आहे.
...अन्यथा बहिष्कार कायम
बहिष्काराच्या निर्णयामुळे आनंद माने यांच्या महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेने गुरुवारी आयोजित केलेली स्पर्धा रद्द केली आहे, असे पालकांना दूरध्वनीवरुन कळविण्यात आले आहे. निवड चाचणी स्पर्धा इचलकरंजीऐवजी कोल्हापुरात एसएफआय निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करावी. संयोजकांनी निरीक्षकांव्यतिरिक्त कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नये. अन्यथा पालक संघटना आपल्या बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम राहील, असा निर्णय जलतरण खेळाडू, पालक समितीने घेतला असल्याची माहिती समितीचे सदस्य रमेश मोरे आणि किरण भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
आमची संघटना मान्यताप्राप्त असून ती गेल्या २८ वर्षांपासून कार्यरत आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे संघटनेची नोंदणी आहे. आमच्या संघटनेकडे नोंदणी केलेल्या खेळाडूंची आज, गुरुवारी राष्ट्रीय जलतरणपटू सागर प्रशांत पाटील जलतरण तलाव येथे निवड चाचणी घेतली जाईल. त्यातून राज्यासाठी खेळाडू पाठविले जातील.
- आनंद माने,
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर अॅक्वेटिक्स असोसिएशन
एसएफआयच्या निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली शनिवारी (दि. १८) इचलकरंजीमध्ये निवड चाचणी होणार आहे. काही पालकांमध्ये असणारे गैरसमज दूर झाले आहेत. एकजुटीने, एकदिलाने निवड चाचणी घेतली जाईल. या स्पर्धेसाठी आजअखेर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील ९० हून अधिक खेळाडूंच्या प्रवेशिका दाखल झाल्या आहेत.
- प्रसाद पाटील,
अध्यक्ष, हौशी जलतरण असोसिएशन, कोल्हापूर