जलतरण तलाव, चित्रपटगृहे मार्गदर्शक तत्त्वानुसार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 11:12 AM2020-11-05T11:12:16+5:302020-11-05T11:15:18+5:30
Swimmingpool, Coronavirus Unlock, collector, kolhapur कोल्हापूर जिल्ह्यातील कंटेन्टमेंट झोनच्या बाहेरील सिनेमा हॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्सेस, ड्रामा थिएटर्स हे ५० टक्के क्षमतेच्या अधिन राहून आज, गुरुवारपासून सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी याबाबतचा आदेश काढला.
कोल्हापूर : जिल्ह्यातील कंटेन्टमेंट झोनच्या बाहेरील सिनेमा हॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्सेस, ड्रामा थिएटर्स हे ५० टक्के क्षमतेच्या अधिन राहून आज, गुरुवारपासून सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी याबाबतचा आदेश काढला.
कंटेन्टमेंट झोनच्या बाहेरील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव, योग वर्ग, अंतर्गत खेळ व चित्रपटगृहे मार्गदर्शक तत्त्वानुसार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, सिनेमा हॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्सेस, ड्रामा थिएटर्समध्ये खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी असणार नाही. याबाबतची मानक कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना या शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत निर्गमित करण्यात येईल.