बावडा बंधाऱ्यावर प्रायोगिक तत्वावर स्विस गेट बसविण्यात यावे : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 05:19 PM2021-07-10T17:19:25+5:302021-07-10T18:34:41+5:30
pollution Board Metting Kolhapur :पंचगंगा नदी स्वच्छ असावी. ती अखंड प्रवाहित राहवी यासाठी नियोजन सुरु आहे. प्रदुषणाच्या अभ्यासाबाबत प्रायोगिक तत्वावर बावडा बंधाऱ्यावर लवकरच स्विस गेट बसविण्यात येईल. जेणेकरुन बंधाऱ्याच्या तळाला असलेली घाण निघुन जाण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर : पंचगंगा नदी स्वच्छ असावी. ती अखंड प्रवाहित राहवी यासाठी नियोजन सुरु आहे. प्रदुषणाच्या अभ्यासाबाबत प्रायोगिक तत्वावर बावडा बंधाऱ्यावर लवकरच स्लुईस गेट बसविण्यात येईल. जेणेकरुन बंधाऱ्याच्या तळाला असलेली घाण निघुन जाण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
पंचगंगा नदी प्रदुषणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, पंचगंगेचे प्रदुषण न होऊ देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. पंचगंगेचे प्रदुषण आटोक्यात आणण्याबाबत प्रशासनाने डीपीआर तयार करावा. तसेच पूर नियंत्रणासाठी राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेटचे अत्याधुनिकीकरण करण्याबाबत विचार सुरु असल्याचेही ते म्हणाले.
प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व बंधाऱ्यांवर स्लुईस गेट 15 ऑक्टोबरपूर्वी कार्यान्वित करावेत जेणेकरुन नदी प्रदुषणाला आळा बसेल असे मत पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी व्यक्त केले.
या बैठकीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियदर्शनी मोरे, ग्रामीण पाणी पुरवठा (जि.प.) विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर आदी उपस्थित होते.