निष्क्रिय प्रभाग समितीवर कारवाईची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:23 AM2021-05-16T04:23:24+5:302021-05-16T04:23:24+5:30
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरावर गेली आहे. गतवर्षापेक्षा यावेळी मृत्यूंची संख्याही वाढली आहे. गतवर्षी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभागनिहाय प्रभाग ...
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरावर गेली आहे. गतवर्षापेक्षा यावेळी मृत्यूंची संख्याही वाढली आहे. गतवर्षी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रभागनिहाय प्रभाग समिती नेमण्यात आली आहे. मात्र यावेळी प्रभाग समिती निष्क्रिय ठरली आहे. त्याचा परिणाम कोरोना संसर्ग वाढण्यावर झाला आहे. मुख्याधिकारी जाधव यांनी लाॅकडाऊनबाबतच्या शासनाच्या कडक नियमांची अंमलबजावणी करताना काही वेळा लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करीत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनही हतबल ठरत आहे.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याने प्रांताधिकारी तथा कोरोना सनियंत्रक डाॅ. खरात यांनी कोरोना संसर्ग वाढण्यात प्रभाग समित्यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला आहे. तसेच अपयशी ठरलेल्या प्रभाग समित्यांचा अहवाल कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याचे आदेश मुख्याधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे निष्क्रिय प्रभाग समितीवर मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष राहणार असल्याने समित्यांचे धाबे दणाणले आहेत.
चौकट -
मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यवाहीकडे लक्ष
प्रभाग समिती पाचजणांची असून त्या प्रभागातील नगरसेवक हा समितीचा अध्यक्ष आहे; तर त्यामध्ये दोन पालिका कर्मचारी, दोन सामाजिक कार्यकर्ते अशा पाचजणांचा समावेश आहे. प्रभाग समिती निष्क्रियतेला अध्यक्षच जबाबदार धरले जाते. कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कडक भूमिका घेतली असून मुख्याधिकारी यांनी प्रभाग निष्क्रियतेचा अहवाल पाठविल्यास नगरसेवक अपात्रतेची कारवाईही कदाचित होऊ शकते.