हॉटेल व्यावसायिकावर पाठलाग करून तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:26 AM2021-04-09T04:26:29+5:302021-04-09T04:26:29+5:30

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून एका हॉटेल व्यावसायिकाचा दुचाकीवरून पाठलाग करून त्याच्यावर तलवार, येडका व हॉकी स्टीकने प्राणघातलक हल्ला करून ठार ...

Sword attack by chasing a hotelier | हॉटेल व्यावसायिकावर पाठलाग करून तलवार हल्ला

हॉटेल व्यावसायिकावर पाठलाग करून तलवार हल्ला

Next

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून एका हॉटेल व्यावसायिकाचा दुचाकीवरून पाठलाग करून त्याच्यावर तलवार, येडका व हॉकी स्टीकने प्राणघातलक हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार शाहू टोल नाक्याजीक घडला. हल्ल्यात सद्दाम अब्दुलसत्तार मुल्ला (वय ३१, रा. कन्हैया सर्व्हिसिंग सेटरनजीक, यादवनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांनी त्याच्या मोटारीचेही तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी एस.टी. गँगच्या सात जणांना अटक केली असून एकूण चौदा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी धरपकड करून सराईत गुन्हेगार गेंड्या ऊर्फ ऋषिकेश बाबासाहेब चौगुले (वय ३२), सूरज अर्जुन कलंगुटगे (१९), रामू मुकुंद कलकुटगे (२१ तिघेही रा. नवशा मारुती चौक, शाहूनगर), प्रसाद जनार्दन सूर्यवंशी (वय २३), अर्जुन वीरसिंग ठाकूर (वय २३, दोघेही रा. तीन बत्ती चौक, दौलतनगर), असू बादशाह शेख (२६, रा. दौलतनगर), करण उदय सावंत (२०, रा. माऊली चौक, राजारामपुरी) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्यासह नितीन ऊर्फ बाॅब दीपक गडीयाल, जव्वा ऊर्फ विराज विजय भोसले, पंडित रमेश पोवार, सनद देशपांडे, विशाल प्रकाश वडार, साईराज जाधव, रोहिती साळोखे अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या सातपैकी पाच जणांना न्यायालयाने दि. १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यादवनगरातील सद्दाम मुल्ला याचा शाहू टोल नाक्यानजीक हॉटेल व्यवसाय आहे. त्याचा सराईत गुन्हेगार गेंड्या ऊर्फ ऋषिकेश बाबासाहेब चौगुले व त्याचे सहकारींशी पूर्ववैमनस्यातून वाद होता. मंगळवारी रात्री सद्दाम हॉटेल बंद करून आपल्या मोटारीतून घरी जाताना मार्गावर दबा धरून बसलेल्या एस.टी. गँगच्या हल्लेखोरांनी चार-पाच दुचाकींवरून त्याच्या मोटारीचा पाठलाग केला. शाहू टोल नाक्यानजीक त्याची मोटार आडवून त्यानी हॉकी स्टीकने मोटारीच्या काचा फोडल्या. सद्दामला मोटारीतून बाहेर ओढून त्याच्यावर तलवार, येडका व हॉकी स्टीकने मारहाण केली. गंभीर जखमी स्थितीत नागरिकांनी सद्दाम मुल्ला याला तातडीने उपचारासाठी राजारामपुरीतील खासगी रग्णालयात दाखल केले.

पाठलाग करून पकडले...

दरम्यान, सायबर चौकातून काही जण दुचाकीवरून वेगाने गेल्याने परिसरात थांबलेल्या पोलिसांना शंका आली, त्यांनी दुचाकींचा पाठलाग केला. हल्लेखोरांपैकी प्रसाद सूर्यवंशी व अर्जुन ठाकर यांना पोलिसांनी पकडले.

तुझा गेमच करतो...

सद्दामला हॉटेलपासून काही अंतरावरच एस.टी. गँगने आडवले. हल्लेखोरांपैकी सराईत गुन्हेगार गेड्या चौगुले याने त्याला, थांब तुला आता संपवतोच, तुझा गेमच करतो, अशी धमकी दिल्याने मुल्लाने मोटार वेगाने पळवली; पण अखेर त्याची मोटार आडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला झालाच.

फोटो नं. ०८०४२०२१-कोल-गेंड्या चौगुले (आरोपी)

फोटो नं. ०८०४२०२१-कोल-सूरज कलंगुटगे (आरोपी)

फोटो नं. ०८०४२०२१-कोल-रामू कलकुटगे (आरोपी)

फोटो नं. ०८०४२०२१-कोल-करण सावंत (आरोपी)

फोटो नं. ०८०४२०२१-कोल-आसू शेख (आरोपी)

Web Title: Sword attack by chasing a hotelier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.