Kolhapur: जयसिंगपुरात भरदुपारी तरुणावर तलवार हल्ला, आईच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 05:13 PM2024-08-19T17:13:03+5:302024-08-19T17:14:11+5:30

घटना सीसीटीव्हीत कैद; तिघांविरुद्ध गुन्हा

Sword attack on Bhardupari youth in Jaisingpur Kolhapur a major disaster was averted due to mother's intervention | Kolhapur: जयसिंगपुरात भरदुपारी तरुणावर तलवार हल्ला, आईच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला 

Kolhapur: जयसिंगपुरात भरदुपारी तरुणावर तलवार हल्ला, आईच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला 

जयसिंगपूर : पूर्ववैमनस्यातून शहरातील नांदणी नाका मार्गावर मोटारसायकलीवरुन आलेल्या तिघांनी तरुणावर भरदुपारी तलवारीने हल्ला केला. आईच्या प्रसंगावधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळला असलातरी या हल्ल्यात सुनील रामाप्पा लमाणी (वय २८, रा.नांदणी नाका, लमाणी वसाहत धरणगुत्ती, ता. शिरोळ) हा जखमी झाला. आत्मरक्षणासाठी महिलेसह त्या तरुणाने दगडफेक सुरू करताच हल्लेखोर पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. 

दरम्यान, याप्रकरणी विनोद कासू पवार, अरविंद कासू पवार (दोघे रा. कालीबागतांडा, एलटी विजयपूर), विनोद बाबू जाधव (रा. नांदणी नाका लमाण वसाहत धरणगुत्ती) या तिघांविरुद्ध जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सुनील लमाणी यांचे वडील लघुशंकेकरिता गेले होते. याच दरम्यान सुनील व त्याची आई वाट पाहत रस्त्यावर थांबले होते. दरम्यान, पाठीमागून तिघे संशयित मोटारसायकलीवरुन आले. संशयित विनोद पवार याने शिवीगाळ करत अचानक सुनील याच्यावर तलवारीने वार केला. याचदरम्यान त्याच्या आईने प्रसंगावधान राखत सुनीलला सावध केले. पाठीवर वार झाल्याने सुनील जखमी झाला. 

याचदरम्यान आत्मरक्षणासाठी आई व सुनील यांनी संशयितावर दगडफेक केली. त्यानंतर संशयित पसार झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेची चित्रफित मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पसरल्याने शहरासह परिसरात या घटनेची चर्चा सुरू होती.

Web Title: Sword attack on Bhardupari youth in Jaisingpur Kolhapur a major disaster was averted due to mother's intervention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.