गुणरत्न सदावर्तेंच्या प्रतिमेला प्रतिकात्मक शॉक, कोल्हापुरात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संतप्त
By भारत चव्हाण | Published: October 30, 2023 05:27 PM2023-10-30T17:27:03+5:302023-10-30T17:27:54+5:30
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देणेची वेळ येते त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांचा वारंवार विरोध करीत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी ...
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देणेची वेळ येते त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांचा वारंवार विरोध करीत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी मनोज जरांगे यांचे विरोधात त्यांनी विधान केले होते. गुणरत्न सदावर्ते यांचा निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेला शॉक देण्याचे अनोखे आंदोलन सोमवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले.
मराठा समाज कडून गेली कित्येक वर्षे आंदोलन करीत आहे. कित्येक मुख मोर्चे निघाले. गेले काही महिन्यापासून मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणासाठी बसले आहेत. महाराष्ट्र सरकारने ४० दिवसाचा वेळ मागितला. तरी देखील महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षण देण्यास असमर्थ ठरले आहे. वेळोवेळी मराठा समाजाला गाजर दाखविण्याचे काम महाराष्ट्र शासनाने केले आहे.
अशा वेळी सदावर्ते काहीही वक्तव्य करीत असल्याबद्दल तीव्र असंतोष असून त्याचे पडसाद सोमवारी उमटले. सदावर्ते यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक शॉक देण्यात आला. यानंतरही त्यांची बुद्धी सुधारली नाही तर संभाजी ब्रिग्रेड वतीने खरोखरचा शॉक देणेत येणार असलेचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी सांगितले.
यावेळी मराठा सेवा संघ माजी जिल्हाध्यक्ष संजय साळोखे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार, जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हाध्यक्षा चारुशीला पाटील, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष अभिजीत भोसले, भगवान कोईगडे, कल्पना देसाई, उमेश जाधव, संगिता पाटील, संतोष सिध्द,अमित सुर्यवंशी, प्रियंका कोईगडे,सचिन पास्ते यांचे उपस्थित होते.