प्रतिकात्मक गोंधळ-जागरातून सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 05:33 PM2019-08-21T17:33:19+5:302019-08-21T17:39:12+5:30
प्रतिकात्मक गोंधळ-जागर आंदोलनाच्या माध्यमातून विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारचा बुधवारी निषेध केला. राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १८ दिवसांपासून उपोषण सुरू आहे.
कोल्हापूर : प्रतिकात्मक गोंधळ-जागर आंदोलनाच्या माध्यमातून विनाअनुदानित शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारचा बुधवारी निषेध केला. राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १८ दिवसांपासून उपोषण सुरू आहे.
येथील कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात कृती समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षक पांडुरंग पाटील, नारायण पारखे, सचिन कांबळे, उत्तम जाधव यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी बुधवारी प्रतिकात्मक गोंधळ-जागर आंदोलन करून सरकार आणि शासनाचा निषेध केला.
यावेळी कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, सुनील कल्याणी, गजानन काटकर, प्रकाश पाटील, राम कदम, शिवाजी कुरणे, प्रेमकुमार बिंदगे, शिवाजी खापणे, भानुदास गाडे, राजू भोरे, बी. जी. पाटील, स्मिता उपाध्ये, साऊ बोरगावकर, विद्या मठपती, यु. आय. शेख, आदी उपस्थित होते.