दोन मिनिटांत बाहेर जाऊन येते म्हणून प्रणाली गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:28 AM2021-08-24T04:28:51+5:302021-08-24T04:28:51+5:30

दरम्यान, या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली असून या बेपत्ता प्रकरणास वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. प्रणालीचा काही ठावठिकाणा ...

The system is gone as it comes out in a couple of minutes | दोन मिनिटांत बाहेर जाऊन येते म्हणून प्रणाली गेली

दोन मिनिटांत बाहेर जाऊन येते म्हणून प्रणाली गेली

Next

दरम्यान, या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली असून या बेपत्ता प्रकरणास वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. प्रणालीचा काही ठावठिकाणा लागल्यास 0230-2450333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

प्रणाली इयत्ता चौथीमध्ये शिकणारी 10 वर्षांची मुलगी. तिचे वडील युवराज चांदी काम करतात. रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास तिच्या आईने तिला किराणा सामान आणण्यासाठी पाठविले होते. त्यांच्या घरानजीक असणाऱ्या दुकानातून साहित्य खरेदी करून तिने घरी पोहोच केले. त्यानंतर दोनच मिनिटांत बाहेर जाऊन येते, असा निरोप आईला देऊन ती घराबाहेर पडली होती. रात्रीचे आठ-साडेआठ वाजून गेले तरीही प्रणाली अजून घरी का आली नाही म्हणून आई-वडिलांनी तिला शोधण्यास सुरुवात केली. दोन-तीन तास सर्वत्र शोधाशोध करूनही ती आढळून आली नाही. प्रणालीच्या बेपत्ता होण्यामुळे साळोखे कुटुंबाबरोबरच संपूर्ण ग्रामस्थांना चिंता सतावू लागली असून, सर्वत्र भीतीचे व धीरगंभीर वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

युवराज यांचा नोव्हेंबर 2019 साली पत्नी अश्विनी हिच्या सोबत विवाह झाला असून, त्याने मुलगीप्रणालीसह अश्विनीस स्वीकारले आहे. आई अश्विनी हिने दोन दिवसांपूर्वी प्रणालीला रागावून दोन थपडा मारल्या असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी साळोखे यांच्या घरानजीकचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता प्रणाली ही रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता पळत जात असलेली दिसत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सहायक पोलीस निरीक्षक विजय मस्कर करीत आहेत.

फोटो-प्रणाली साळोखे.

Web Title: The system is gone as it comes out in a couple of minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.