प्रणाली खूनप्रकरणी आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:55+5:302021-08-28T04:27:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील प्रणाली साळुंखे या मुलीला तिच्या सावत्र बापाने पंचगंगा नदीमध्ये ढकलून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील प्रणाली साळुंखे या मुलीला तिच्या सावत्र बापाने पंचगंगा नदीमध्ये ढकलून तिचा खून केला. या प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, यासाठी इचलकरंजी बार असोसिएशनला महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्यावतीने निवेदन दिले.
निवेदनात, आत्माराम साळुंखे (सासरे), शांताबाई साळुंखे (सासू), छाया चव्हाण (नणंद), संजय माळी (कबनूर) या सर्वांनी कट करून या मुलीचा खून केला आहे. या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. जिल्ह्यामध्ये एकापाठोपाठ एक अशा तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने याकडे लक्ष द्यावे. जोपर्यंत आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होत नाही, तोपर्यंत मुलीचे रक्षाविसर्जन करणार नाही, असे आईने ठरविले आहे. त्यामुळे या आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये व बाहेरील वकिलांना घेण्यापासून दूर ठेवावे, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात सिंधू शिंदे, रवी गोंदकर, दत्ता पाटील, शहाजी भोसले, सुनील हजारे, आदींसह महिला व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
फोटो ओळी
२७०८२०२१-आयसीएच-०१
यळगुड (ता. हातकणंगले) येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणीही वकीलपत्र घेऊ नये यासाठी मनसे महिला आघाडीने बार असोसिएशनला निवेदन दिले.
छाया-उत्तम पाटील.