प्रणालीला न्याय मिळेपर्यंत अस्थी विसर्जन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:29 AM2021-08-28T04:29:37+5:302021-08-28T04:29:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील प्रणाली साळुंखे या मुलीला तिच्या सावत्र बापाने पंचगंगा नदीमध्ये ढकलून ...

The system will not dismantle the bones until justice is done | प्रणालीला न्याय मिळेपर्यंत अस्थी विसर्जन करणार नाही

प्रणालीला न्याय मिळेपर्यंत अस्थी विसर्जन करणार नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील प्रणाली साळुंखे या मुलीला तिच्या सावत्र बापाने पंचगंगा नदीमध्ये ढकलून तिचा खून केला. या प्रकरणातील बापासह अन्य आरोपींना शिक्षा होऊन मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत तिच्या अस्थी विसर्जन करणार नाही, असे तिच्या आईसह मामा व कुटुंबीयांनी निवेदन देताना सांगितले.

यळगूड येथे शुक्रवारी प्रणालीचे रक्षाविसर्जन होते. त्यासाठी परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते. त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यावेळी रक्षा व अस्थी बाजूला करण्यात आल्या. त्यातील अस्थी बाजूला काढून तिला न्याय मिळाल्यानंतरच त्याचे विसर्जन करू, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली.

नातेवाइकांसह महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्यावतीने याबाबतचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना दिले.

वकीलपत्र घेऊ नये ; बार असोसिएशनलाही निवेदन

प्रणाली साळुंखे खून प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, यासाठी इचलकरंजी बार असोसिएशनला प्रणालीच्या नातेवाइकांसह महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्यावतीने निवेदन दिले. त्यामध्ये बाहेरील वकिलांनाही वकीलपत्र घेण्यापासून दूर ठेवावे, असे म्हटले आहे. यावेळी आई सरिता साळुंखे, मामा सुनील माने व कुटुंबीय आणि मनसेचे सिंधू शिंदे, रवी गोंदकर, दत्ता पाटील, शहाजी भोसले, सुनील हजारे, आदींसह महिला व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

फोटो ओळी

२७०८२०२१-आयसीएच-०१

यळगुड (ता. हातकणंगले) येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणीही वकीलपत्र घेऊ नये, यासाठी मनसे महिला आघाडीने बार असोसिएशनला निवेदन दिले.

छाया-उत्तम पाटील

Web Title: The system will not dismantle the bones until justice is done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.