ताई-दादा...सांगा, माझी काँगे्रस कुठं हाय ओ!

By admin | Published: November 15, 2016 12:06 AM2016-11-15T00:06:17+5:302016-11-15T00:28:15+5:30

गडहिंग्लज पालिका : एस. एस. घाळींच्या पश्चात काँगे्रस पालिकेतील सत्तेपासून दूरच

Tai-dada ... tell me my Congress where he is! | ताई-दादा...सांगा, माझी काँगे्रस कुठं हाय ओ!

ताई-दादा...सांगा, माझी काँगे्रस कुठं हाय ओ!

Next

राम मगदूम --गडहिंग्लज --सलग २२ वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेले डॉ. एस. एस. घाळी यांच्या पश्चात सर्वसमावेशक नेतृत्व न मिळाल्यामुळेच अपवाद वगळता काँगे्रस पक्ष गडहिंग्लज पालिकेच्या सत्तेपासून दूरच राहिला. गटबाजी आणि स्वार्थाची बाधा झालेल्या नेत्यांमुळेच गडहिंग्लजमधून काँगे्रस हद्दपार झाली. याची प्रचिती नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा आली.
६० च्या दशकात काँगे्रसला डॉ. घाळींचे नेतृत्व लाभले. त्यामुळेच गडहिंग्लजमध्ये विविध संस्थांची उभारणी व पक्षाची मजबूत बांधणी झाली. मात्र, त्यानंतर गटबाजीची बाधा कायम राहिली. त्यामुळेच हा पक्ष आता अस्तित्वहीन झाला.
१९९१ मध्ये बाबासाहेब कुपेकर यांनी भाजप-सेनेसह सर्व पक्ष-गटांची मोट बांधून ‘राजर्षी शाहू आघाडी’च्या माध्यमातून जनता आघाडीकडून पालिकेची सत्ता काढून घेतली. मात्र, अंतर्गत मतभेद आणि लाथाळ्यामुळेच नशिबाने मिळालेली सत्ता काँगे्रसला अबाधित ठेवता आली नाही. त्याचीच पुनरावृृत्ती राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर २००१मध्ये सर्वपक्षीय महालक्ष्मी आघाडी आणि २०११ मध्ये राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत झाली. त्याचाच फटका कुपेकरांच्या पश्चात राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांना व पक्षाला बसला.

१९९१, २००१ व २०११ या तीन निवडणुकांचा अपवाद वगळता दर दहा वर्षांनी पालिकेत सत्तांतर झाले. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या काँगे्रस व राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांना ती सत्ता अबाधित राखता आली नाही.

१९७० च्या दशकापासून पालिकेच्या राजकारणात सक्रिय राहिलेल्या अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घाळी यांच्याप्रमाणेच समाजाभिमुख राजकारणाचा कित्ता गिरविला आणि बहुजन समाजातील डझनभर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदाचा बहुमान दिल्यानेच गडहिंग्लजवर त्यांची पकड निर्माण झाली.
गतवेळी जनता आघाडीबरोबर आणि यावेळी राष्ट्रवादीबरोबर युती करून काँगे्रसचे चिन्ह पुन्हा जनमाणसात रुजविण्याचा प्रयत्न आमदार सतेज पाटील यांनी केला. मात्र, त्यांना स्थानिक नेते व परिस्थितीची साथ मिळाली नाही. यामुळेच नेते, ‘काँगे्रस’प्रेमी गडहिंग्लजकरांना कपाळावर ‘हात’ मारून घेण्याची वेळ आली आहे.

Web Title: Tai-dada ... tell me my Congress where he is!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.