अपघातप्रकरणी संबंधितांवर कारवाई करा : आयुक्तांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 06:25 PM2017-10-03T18:25:54+5:302017-10-03T18:28:02+5:30
नादुरूस्त बसेस रस्त्यावरून फिरवून के.एम.टी. प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. त्यामुळे अपघातात निष्पापांचे जीव जात आहेत. रविवारी झालेल्या अपघातास जबाबदार असणाºया सर्व संबंधित अधिकाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती तसेच अखिल भारतीय हिंदू महासभेच्यावतीने महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांना देण्यात आले.
कोल्हापूर : नादुरूस्त बसेस रस्त्यावरून फिरवून के.एम.टी. प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. त्यामुळे अपघातात निष्पापांचे जीव जात आहेत. रविवारी झालेल्या अपघातास जबाबदार असणाºया सर्व संबंधित अधिकाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती तसेच अखिल भारतीय हिंदू महासभेच्यावतीने महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांना देण्यात आले.
भ्रष्टचारविरोधी जनशक्ती संघटनेच्या कोल्हापूर शाखेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी आयुक्त अभिजित चौधरी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात शहर अध्यक्षा गीता गुरव, संजीवनी पाटगांवकर, उज्ज्वला चौगले, सुमन ढेरे, तारकेश्वरी साळवी, शीतल पाटील, माधुरी केंबळे, सुनीता पंदारे, वंदना साळुंखे, राधिका खडके, अश्विनी वांगरे, वैशाली जाधव, राजेंद्र पायमल, प्रशांत खाडे यांचा समावेश होता.
अपघाताचे गांभीर्य पाहता प्रशासनाचा निष्काळजीपणा पुढे आला आहे. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी के.एम.टी. बसची तांत्रिक दुरुस्ती रोजच्या रोज झाली पाहिजे. बसचालकांची नियमित आरोग्य तपासणी झाली पाहिजे, अशा सूचना आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात केल्या आहेत.
एकीकडे गणेशोत्सव मिरवणुकीत ‘१४४ कलम’ लावण्याची दादागिरी करणाºया पोलीस प्रशासनाने या ताबूत विसर्जन मिरवणुकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोलीस प्रशासनही या निष्पाप बळींला जबाबदार आहे, असा आरोप करून घडलेल्या प्रकाराची चौकशी करून सर्व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
मंगळवारी दुपारी हिंदू महासभेचे एक शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले. त्यामध्ये नंदकुमार घोरपडे, मनोहर सोरप, रेखा दुधाणे, दीपाली खाडे, सुवर्णा पवार, रश्मी आडसुळे, सरोज फडके, किशोर घाडगे, चंद्रकांत बराले, जयवंत निर्मळ, अजय शिंदे, अजिंक्य जाधव, मधुकर नाझरे यांचा समावेश होता.
दिवाळी सणात होणाºया गर्दीच्या महाद्वार रोडवरील के.एम.टी. रूट बंद करावा, नादुरूस्त बसेस रस्त्यावरून धावणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अपघाताची चौकशी करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.