आरटीओ परिसरात क्रिकेट खेळणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 06:20 PM2021-04-01T18:20:49+5:302021-04-01T18:23:43+5:30
Rto Office Kolhapur-कोरोनाची नियमावली धाब्यावर बसवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात मोकळ्या मैदानात एका दलालाच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती. यात कोविडच्या नियमावलीचे उल्लंघन झाले असून, संबंधित कर्मचाऱ्यावर सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिस यांची भेट घेत दिला. या प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
कोल्हापूर : कोरोनाची नियमावली धाब्यावर बसवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात मोकळ्या मैदानात एका दलालाच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती. यात कोविडच्या नियमावलीचे उल्लंघन झाले असून, संबंधित कर्मचाऱ्यावर सोमवारपर्यंत कारवाई करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिस यांची भेट घेत दिला. या प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
राज्य शासन कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी गंभीर पावले उचलत आहे. मात्र, शासनाचे एक अंग असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात २८ मार्चला एका दलालाच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा घेऊन मोठा जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे स्पर्धेला प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. याबाबत मात्र प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीव्हन अल्वारिस यांना कोणतीही कल्पना दिलेली नव्हती.
कोरोनाचा धोका पत्करून व विनापरवाना शासकीय जागेचा वापर करून या क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामुळे संबंधितावर सोमवारपर्यंत कडक कारवाई करा, अन्यथा प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा वाहनधारक महासंघाच्या शिष्टमंडळाने दिला. यावेळी चंद्रकांत भोसले, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, इंद्रजित शिंदे, सर्जेराव कामीरकर, अल्ताफ जमाखाने, सुनील पाटील, उदय गायकवाड, निवास बोडके, अतुल माळकर यांच्यासह वाहनधारक उपस्थित होते.