घरफाळा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:18 AM2021-06-29T04:18:11+5:302021-06-29T04:18:11+5:30
कोल्हापूर : महापालिकेत उघड झालेल्या घरफाळा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई करावी, घोटाळ्यातील चौकशीचा अंतिम अहवाल जाहीर करावा, या मागणीचे ...
कोल्हापूर : महापालिकेत उघड झालेल्या घरफाळा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई करावी, घोटाळ्यातील चौकशीचा अंतिम अहवाल जाहीर करावा, या मागणीचे निवेदन ‘ई’ वार्ड लोककल्याण व संघर्ष समितीतर्फे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, सन २०२० मध्ये महापालिकेतील घरफाळा घोटाळा उघड झाला. त्याची व्याप्ती किती कोटींची आहे, हे जाहीर करावे. १९९६ पासून घरफाळा विभागाची १५५ प्रकरणे न्यायालयासमोर प्रलंबित आहेत. यास जबाबदार कोण? हे समोर आले पाहिजे. या १५५ प्रकरणात किती घरफाळा थकलेला आहे, तो जाहीर करावा. मालमत्तेसंबंधी खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी, घरफाळा लागू न झालेली शहरातील घरे, प्लॅटसंबंधीची माहिती जनतेसमोर आणावी. निवेदन देताना अॅड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, ऋतुराज माने, तुषार आळवेकर आदी उपस्थित होते.