खासगी रुग्णालये सांभाळणाऱ्या ‘सीपीआर’मधील डॉक्टरांवर कारवाई करा : कोल्हापूर अभ्यागत समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 08:27 PM2017-12-28T20:27:40+5:302017-12-28T20:35:59+5:30

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) नोकरी करून स्वत:ची खासगी रुग्णालये सांभाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा,

 Take action against the doctors of CPR, which is organizing private hospitals: meeting of the Kolhapur visitor committee | खासगी रुग्णालये सांभाळणाऱ्या ‘सीपीआर’मधील डॉक्टरांवर कारवाई करा : कोल्हापूर अभ्यागत समितीची बैठक

खासगी रुग्णालये सांभाळणाऱ्या ‘सीपीआर’मधील डॉक्टरांवर कारवाई करा : कोल्हापूर अभ्यागत समितीची बैठक

Next
ठळक मुद्देकागदपत्रांसाठी रुग्णांची अडवणूक न करण्याच्या सूचनारुग्णांच्या तपासणी कामात ढिलाई करणाऱ्या डॉक्टरांची गैर करू नका,

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) नोकरी करून स्वत:ची खासगी रुग्णालये सांभाळणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा, तसेच रुग्णांच्या तपासणी कामात ढिलाई करणाऱ्या डॉक्टरांची गैर करू नका, अशा सूचना सीपीआरध्ये गुरुवारी झालेल्या अभ्यागत समितीच्या बैठकीत करण्यात आली.

जिल्'ासह परजिल्ह्यातून   येणाऱ्या रुग्णांची कागदपत्रांसाठी अडवणूक करू नका, अशाही सूचना यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी आमदार अमल महााडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे हे प्रमुख उपस्थित होते.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्गसह सीमाभागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात, पण कागदपत्रांअभावी या रुग्णांची हेळसांड होत असल्याची तक्रार आहे, अशा रुग्णांची कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक करू नका, त्यांच्यावर वेळीच उपचार करावेत, अशाही सूचना या बैठकीत मांडल्या.
सीपीआर रुग्णालयातील ड्रेनेज पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. पिण्याच्या पाईपलाईन खराब झाल्याने त्या त्वरित बदलण्याच्या तसेच शौचालयांबाबतचा प्रश्न त्वरित सोडविण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली.

सीपीआरमधील अपघात विभागाचे नूतनीकरण त्वरित करून अपघात आणि केसपेपर विभाग सुसज्ज करावा, असेही प्रश्न त्यांनी मांडले. सीपीआरमध्ये उपचारासाठी येणाºयांची संख्या वाढल्याने त्यांना दिल्या जाणाºया सुविधांची माहिती कळावी म्हणून रुग्णालयाच्या आवारात जनजागृती फलक लावावेत, ‘सीपीआर’साठी निधीबरोबर मनुष्यबळही कमी पडणार नसल्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी यावेळी दिली.
रुग्णांच्या जीवाशाी खेळणारे अनेक बोगस डॉक्टर शहरात कार्यरत असून त्यांची शोधमोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.

प्रसुती विभागातील रुग्णांकडे पैसे मागणाऱ्या महिला कर्मचाºयांवर कारवाई करा, रिक्त कर्मचाऱ्याच्या जागा भरती करा, अशा सूचना यावेळी पश्चिम महाराष्ट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सुनील करंबे यांनी मांडून लक्ष वेधले. यावेळी डॉ. वसंतराव देशमुख, डॉ. संदीप साळोखे, डॉ. शिरीष शानभाग, डॉ. अमरनाथ सेलमोकर, डॉ. इंद्रजित काटकर, डॉ. उल्हास मिसाळ, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, अजित गायकवाड आदी उपस्थित होते.
 

...अन्यथा माझ्याशी गाठ
सीपीआरमध्ये नोकरी करत काही डॉक्टर स्वत:ची खासगी रुग्णालये सांभाळत आहेत. रुग्णांना सेवा देण्यापेक्षा त्या रुग्णांना स्वत:च्या रुग्णालयात नेण्यासाठी या डॉक्टरांना अधिक रस असल्याची टीका करत अशा डॉक्टरांची गय केली जाणार नाही, अन्यथा माझ्याशी गाठ आहे, असा दमच आमदार क्षीरसागर यांनी यावेळी सीपीआर प्रशासनाला दिला.
 

अतिक्रमण हटवा  सीपीआर परिसरात रात्रीच्यावेळी अनधिकृत टपºया उभ्या केल्या जातात, त्या कोणाच्या आशीवार्दाने उभारतात, असा प्रश्न उपस्थित करत या टपºया त्वरित हटवाव्यात, असे महेश जाधव यांनी प्रशासनाला सुनावले. या विषयावर वारंवार चर्चा करण्यापेक्षा कृती करा, निष्काळजी राहू नका, असेही खडे बोल सुनावले.
तक्रार पेटी
सीपीआर रुग्णालयातील तक्रारीबाबत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या कक्षाबाहेर एक तक्रार पेटी बसविण्याचा निर्णय झाला. त्यातील येणाºया तक्रारींचे निवारण करण्यात येणार असल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले.

 कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत विविध समस्यांबाबत सूचना मांडण्यात आल्या. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आदी उपस्थित होते.
 

 

Web Title:  Take action against the doctors of CPR, which is organizing private hospitals: meeting of the Kolhapur visitor committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.