अवैध माती उत्खननाबाबत कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:33+5:302021-03-13T04:44:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शिरोळ तालुक्यातील काही गावांत काहीजणांकडून बेकायदेशीररीत्या मातीचे उत्खनन सुरू असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल ...

Take action against illegal soil excavation | अवैध माती उत्खननाबाबत कारवाई करा

अवैध माती उत्खननाबाबत कारवाई करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शिरोळ तालुक्यातील काही गावांत काहीजणांकडून बेकायदेशीररीत्या मातीचे उत्खनन सुरू असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. याकडे प्रशासन अधिकारी, तलाठी व सर्कल हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे त्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी किसान सेलने प्रांत कार्यालयाबाहेर उपोषण केले. तसेच मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात दिले.

निवेदनात, कनवाड, शेडशाळ, चिंचवाड, कवठेगुलंद, अर्जुनवाड, उदगाव, नांदणी व कोथळी या गावांत माती उत्खनन करण्यासाठी काही शेती गट नंबरमध्ये ५०० ते १००० ब्रासपर्यंत मंजुरी दिली होती; परंतु मंजुरीपेक्षा ५० पटीने जादा उत्खनन सुरू आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. जादा उपसा केलेल्या मातीचा तलाठी व सर्कल यांनी काही ठिकाणचा पंचनामा केला आहे, तर काही ठिकाणी केलेला नाही, असे म्हटले आहे. उपोषणास सुनील कुरूंदवाडे, गौतम कांबळे, दादासाहेब गायकवाड, शंकर कांबळे, किरण कांबळे बसले आहेत.

फोटो ओळी

१२०३२०२१-आयसीएच-०३

बेकायदेशीररीत्या माती उत्खननाबाबत संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी किसान सेलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत कार्यालयाबाहेर उपोषण केले.

छाया-उत्तम पाटील

Web Title: Take action against illegal soil excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.