डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ कॉन्फरन्सच्या आयोजकांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:53 AM2021-09-02T04:53:52+5:302021-09-02T04:53:52+5:30

कोल्हापूर : डिस्मेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या १ ते १२ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये हिंदू धर्म आणि हिंदुत्वाविषयी ...

Take action against the organizers of Dismantling Global Hindutva 'Conference | डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ कॉन्फरन्सच्या आयोजकांवर कारवाई करा

डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ कॉन्फरन्सच्या आयोजकांवर कारवाई करा

Next

कोल्हापूर : डिस्मेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या १ ते १२ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये हिंदू धर्म आणि हिंदुत्वाविषयी चुकीचा प्रसार करून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील वक्ते व आयोजकांवर गुन्हे दाखल करावेत व त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊ नये, अशी कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने बुधवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.

निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या परिषदेशी संबंधित संस्थांचा हिंदूंना कमी लेखण्याचा, तसेच हिंदूंचा झालेला वंशसंहार नाकारण्याचा प्रदीर्घ इतिहास जगजाहीर आहे. असे विचार जगभरातील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांपर्यंत जाणे चुकीचे ठरेल. त्यामुळे या कार्यक्रमाला ज्या विदेशांतील विद्यापीठांनी पाठिंबा दिला आहे किंवा प्रायोजकत्व घेतले आहे, त्यांना भारत सरकारकडून पत्र पाठवून हा कार्यक्रम रद्द करण्याचे व प्रायोजकत्व मागे घेण्यास सांगावे, हा कार्यक्रम भारतद्रोही आणि हिंदुद्रोही अजेंडा घेऊन समाजात हिंदूंना बदनाम करत असल्याने यामध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, किशोर घाटगे, शशिकांत बीडकर, संतोष चौगुले, चंद्रकांत बराले, प्रमोद सावंत, सचिन गुरव, बाबासोा मगदूम, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी उपस्थित होते.

--

फोटो नं ०१०९२०२१-कोल-हिंदू जनजागृती समिती

ओळ : कोल्हापुरातील हिंदू जनजागृती समितीच्यावतीने बुधवारी डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ कॉन्फरन्सच्या आयोजकांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले.

Web Title: Take action against the organizers of Dismantling Global Hindutva 'Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.