सुभाष नांगरे यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, जागर फौंडेशनची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 06:35 PM2019-02-06T18:35:24+5:302019-02-06T18:37:53+5:30
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयवक डॉ. सुभाष नांगरे यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जागर फौंडेशनच्या वतीने गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने यांच्याकडे बुधवारी केली.
कोल्हापूर : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयवक डॉ. सुभाष नांगरे यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जागर फौंडेशनच्या वतीने गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने यांच्याकडे बुधवारी केली.
डॉ. नांगरे यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात काही समाजकंटकांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. डॉ. नांगरे यांनी जयसिंगपूर येथील एका रुग्णालयाची चौकशी करून तेथील महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद केली. त्याचा राग मनात ठेवून त्यांच्याशी हितसंब्ांधी लोकांनी डॉ. नांगरे यांना मारहाण केली.
शासकीय कामकाज करीत असताना गैरव्यवहाराला पाठीशी घालावे, यासाठी काही समाजकंटकांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी हे कृत्य केले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जागर फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले यांनी सतीश माने यांच्याकडे केली.
यावेळी पीटर चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, गडमुडशिंगीचे माजी सरपंच सर्जेराव पाटील, हिंदुराव पोवार, राजाराम कांबळे, चंद्रकांत खोंद्रे, राजेंद्र मालेकर, संदीप शहापूरकर, आदी उपस्थित होते.