रेड झोनमध्ये बांधकामाला परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:03+5:302021-07-27T04:26:03+5:30

इचलकरंजी : पूरग्रस्त भागातील नागरिकांना शासनाने जास्तीत जास्त मदत द्यावी, तसेच रेड झोनमधील बांधकामास परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे ...

Take action against those who allow construction in the red zone | रेड झोनमध्ये बांधकामाला परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करा

रेड झोनमध्ये बांधकामाला परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करा

googlenewsNext

इचलकरंजी : पूरग्रस्त भागातील नागरिकांना शासनाने जास्तीत जास्त मदत द्यावी, तसेच रेड झोनमधील बांधकामास परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटपप्रसंगी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, पूरग्रस्त भागातील नाले व ओढे हे स्वच्छ करावे, तसेच शासनाने मदतीसह या महापुरावर कायमचा तोडगा काढावा, असे सांगितले. नाट्यगृह व इतर ठिकाणी स्थलांतरित केलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. रिंग रोड येथील जनावरांना पाच टन चारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. यावेळी नगरसेवक राहुल खंजिरे, रामदास कोळी, गोवर्धन दबडे, हेमंत वणकुंद्रे, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

२६०७२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजीतील पूरग्रस्त भागाची माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक राहुल खंजिरे, गोवर्धन दबडे, हेमंत वणकुंद्रे, आदी उपस्थित होते.

Web Title: Take action against those who allow construction in the red zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.