विद्यापीठाची बदनामी, विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:25 AM2020-12-31T04:25:51+5:302020-12-31T04:25:51+5:30
तांत्रिक आणि व्याकरणातील चुकांमुळे विविध ठराव, प्रश्न अधिसभेत स्वीकारण्यात आले नाहीत. जे प्रश्न उपस्थित झाले. त्याची प्रशासनाकडून मिळालेली उत्तरे ...
तांत्रिक आणि व्याकरणातील चुकांमुळे विविध ठराव, प्रश्न अधिसभेत स्वीकारण्यात आले नाहीत. जे प्रश्न उपस्थित झाले. त्याची प्रशासनाकडून मिळालेली उत्तरे आणि त्यावर सदस्यांनी केलेली चर्चा यामध्ये विस्कळीतपणा या सभेमध्ये स्पष्टपणे जाणविला. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्याशी संबंधित असणारे अनेक महत्त्वाचे प्रश्नांवर चर्चा झाली नाही. त्यावर विद्यापीठ परिनियमांतील तरतुदीनुसार अधिसभेत ठराव, प्रश्न मांडण्याबाबत सदस्यांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत अधिसभा सदस्य डॉ. प्रताप पाटील यांनी मांडले.
कोण, काय, म्हणाले?
भैय्या माने : प्रशासनाने निष्काळजीपणा सोडावा. प्रश्न मांडण्यामागील सदस्यांची भावना समजून घ्यावी.
अमरसिंह रजपूत : अधिविभागांतील राजकारण, वाद बंद होऊन विद्यार्थ्यांचे कल्याण व्हावे.
डॉ. प्रताप पाटील : विद्यार्थ्यांचे नुकसान, विद्यापीठाची बदनामी करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी.
निलंकठ खंदारे : परिनियमांची मोडतोड करून प्रशासनाने आमचे प्रश्न नाकारले आहेत. त्याबाबत कुलपतींकडे ‘सुटा’ कुलपतींकडे तक्रार करणार
या सभेतील वादाचे मुद्दे
ठरावातील व्याकरणाच्या चुका, कार्यसूचीमधील त्रुटी
प्रशासनाकडून चुकीची माहिती, प्रश्न नाकारण्याचा मुद्दा
हलकर्णी येथील एका मागासवर्गीय प्राध्यापकावर प्रशासनाने अन्याय केल्याचा प्रश्न
अधिसभा सदस्यांच्या सूचनांचा अंतर्भाव नसणे. त्याचे कारण त्यांना कळविल्याचा मुद्दा