पंचगंगा प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 07:17 PM2020-12-30T19:17:23+5:302020-12-30T19:19:50+5:30

collector kolhapur- पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करा, या विषयात कोणाचीही गय करू नका, असे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

Take action against those who pollute Panchganga: Collector Daulat Desai | पंचगंगा प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

पंचगंगा प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Next
ठळक मुद्देपंचगंगा प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करा, या विषयात कोणाचीही गय करू नका, असे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी बुधवारी विभागीय आयुक्त सौरभ यांनी बैठक आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी देसाई यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, पंचगंगा नदीला जोडणारे नाले वळवण्याचे काम पूर्ण होईपर्यंत हे सांडपाणी अन्यत्र वळवून त्यावर प्रक्रिया करता येते का हे पाहावे, प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या उद्योगधंद्यांवर थेट कारवाई करावी, ज्या ग्रामपंचायतींना सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी निधी मिळाला आहे, त्यांनी तातडीने कामाला सुरुवात करावी, इचलकरंजी नगरपालिकेने नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा व त्या त्या विभागांना ही जबाबदारी सोपवावी.

Web Title: Take action against those who pollute Panchganga: Collector Daulat Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.