धोकादायक इमारतींवर कारवाई करा, प्रशासक बलकवडे यांचे अधिकाऱ्यांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 05:42 PM2021-06-08T17:42:48+5:302021-06-08T17:44:46+5:30
Rain Muncipalty Kolhapur : पावसाळा तोंडावर आल्याने शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करावी, किती इमारतींवर कारवाई केली, किती इमारती उतरवल्या, स्ट्रक्चरल ऑडीट किती इमारतींचे केले, किती इमारती दुरुस्त केल्या यासंबंधीची सविस्तर माहिती दोन दिवसात देण्याच्या सूचना महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाऊस आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
कोल्हापूर : पावसाळा तोंडावर आल्याने शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करावी, किती इमारतींवर कारवाई केली, किती इमारती उतरवल्या, स्ट्रक्चरल ऑडीट किती इमारतींचे केले, किती इमारती दुरुस्त केल्या यासंबंधीची सविस्तर माहिती दोन दिवसात देण्याच्या सूचना महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाऊस आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
प्रशासक डॉ. बलकवडे म्हणाल्या, पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांना कोरोनासंबंधीचे नियम पाळून स्थलांतरीत करण्याचे नियोजन करावे. त्यांच्यासाठी आताच आणखीन शाळा किंवा हॉल बघून ठेवावे. उद्यान व विद्यूत विभागाने शहरातील धोकादायक झाडे, पोल पावसापूर्वी उतरवून घेण्याची कार्यवाही करावी. महापूर आल्यास बाधीत क्षेत्रातील वाहने पार्किंग करण्यासाठी आणि जनावरे ठेवण्यासाठी विभागीय कार्यालयांनी आपल्या क्षेत्रातील ओपन स्पेस आरक्षित करावे. ज्याठिकाणी नाले सफाई झालेली आहे, अशा ठिकाणी पहिल्या मोठया पावसाने पुन्हा गाळ भरला असेल तर त्याठिकाणी पुन्हा चॅनेल साफ करुन घ्यावे.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापनेचा आराखडा सादर केला. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, निखील मोरे, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त चेतन कोंडे, संदीप घार्गे, जल अभियंता अजय साळोंखे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, प्रशासन अधिकारी शंकर यादव, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता मीरा नगीमे आदी उपस्थित होते.