डिजिटल सातबाराचा लाभ घ्यावा : गणपतराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:48+5:302021-07-23T04:16:48+5:30
शिरोळ : जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्थापन केलेल्या डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगाव सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांना व ...
शिरोळ : जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्थापन केलेल्या डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगाव सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांना व सभासदांना वेळोवेळी अनेकविध सेवा सुविधा पुरविल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डिजिटल साताबारा वितरण प्रणाली सुरुवात केली आहे. बँकेच्या प्रत्येक शाखांमधून ही प्रणाली कार्यरत होणार आहे. त्यामुळे या सुविधेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले.
येथील आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगांव सहकारी बँकेत डिजिटल सातबारा वितरण प्रणालीचे उद्घाटन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा वितरित करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष महादेव राजमाने, उपाध्यक्ष महेंद्र बागे, विनायक कदम यांच्यासह शेतकरी, सभासद उपस्थित होते.
फोटो ओळ - २२०७२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - शिरोळ येथील आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगांव बँकेत डिजिटल सातबारा वितरण प्रणालीचे उद्घाटन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.