वाणिज्य वारणा दूध संघाच्या उत्पादनांचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:32+5:302021-01-02T04:19:32+5:30
कोल्हापूर : भवानी मंडप येथील शेतकरी संघाच्या दालनात वारणा दूध संघाची उत्पादने उपलब्ध करण्यात आली आहेत. ...
कोल्हापूर : भवानी मंडप येथील शेतकरी संघाच्या दालनात वारणा दूध संघाची उत्पादने उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन शेतकरी संघाचे अध्यक्ष जी. डी. पाटील यांनी येथे केले.
येथील शेतकरी सहकारी संघामध्ये गुरुवारी सायंकाळी वारणा दूध संघाच्या ‘वारणा दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्रा’चे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाबासो पाटील, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्यासह संचालक उपस्थित होते.
पाटील यांनी स्वागत करून शेतकरी संघाच्या इतर कार्यक्षेत्रांतदेखील ‘वारणा’ची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर म्हणाले, शेतकरी संघ आणि ‘वारणा’चे पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत. वारणाच्या उत्पादनांनी भारतीय बाजारपेठेत नावलौकिक प्राप्त केला आहे. आता वारणा दूध संघ व शेतकरी संघ एकत्रित सहभागी झाल्याने आणखी प्रगतीचा टप्पा गाठता येईल. गुरुवारी पहिल्या दिवशी वारणा मिल्क शॉपीस ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
संघाचे उपाध्यक्ष बाबासो पाटील (भुयेकर), माजी अध्यक्ष अमरसिंह माने, संचालक शशिकांत पाटील (चुयेकर), विजयकुमार चौगले, मुख्य व्यवस्थापक अप्पासाहेब निर्मळ, वारणा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक एच. आर. जाधव, प्रदीप देशमुख, अरुण पाटील, शिवाजी जंगम, महेंद्र शिंदे, अकौंट्स मॅनेजर सुधीर कामेरीकर, मार्केटिंगचे एस. एल. मगदूम, आर. व्ही. देसाई, शेती अधिकारी अशोक पाटील, प्रवीण शेलार, शरद शेटे, अभिजित भोसले यांच्यासह दोन्ही संघांचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
३११२२०२० कोल वारणा दूध
कोल्हापूर येथील शेतकरी सहकारी संघाच्या मुख्य कार्यालयात वारणा दूध संघाच्या दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष जी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष बाबासो पाटील, मुख्य व्यवस्थापक अप्पासाहेब निर्मळ, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर व इतर संचालक उपस्थित होते.