अंबाबाईचे दर्शन घ्या आता उंबऱ्याच्या आतून; गर्दीचे दिवस वगळता वर्षभर सुविधा सुरू राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 06:12 AM2023-08-29T06:12:06+5:302023-08-29T06:14:26+5:30

कोरोनामुळे शंखतीर्थ चौकातून मुखदर्शन सुरू झाले हाेते.

Take darshan of Ambabai now from inside Umbra | अंबाबाईचे दर्शन घ्या आता उंबऱ्याच्या आतून; गर्दीचे दिवस वगळता वर्षभर सुविधा सुरू राहणार 

अंबाबाईचे दर्शन घ्या आता उंबऱ्याच्या आतून; गर्दीचे दिवस वगळता वर्षभर सुविधा सुरू राहणार 

googlenewsNext

कोल्हापूर : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज मंगळवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई भक्तांना देवीचे जवळून दर्शन घेता येणार आहे. कोरोना काळात बंद केलेले पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाला परवानगी देण्यात आली असून, गर्दीचे दिवस वगळता वर्षभर ही सुविधा सुरू राहणार आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

कोरोनामुळे शंखतीर्थ चौकातून मुखदर्शन सुरू झाले हाेते. कोल्हापूर जिल्ह्याला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ऐतिहासिक वास्तू, मंदिरे व पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे. येत्या काळात भूमिगत विद्युत वाहिन्या तसेच दर्शन रांगा व वाहनतळही जमिनीखालून केले जाणार असल्याचे केसकर यांनी सांगितले.

Web Title: Take darshan of Ambabai now from inside Umbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.