चार दिवसांचा वेळ द्या, एकत्र बसून निर्णय घेवू :  नंदिनी बाभूळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:20 PM2019-09-24T14:20:57+5:302019-09-24T14:28:09+5:30

राजकारणाच्या पलिकडे कार्यकर्त्यांशी आपले नाते आहे. त्यांच्या भावनांचा अनादर करण्याच पाप कधीच करणार नाही. विचार करायला चार दिवसांचा अवधी द्या, सर्वजण एकत्र बसूनच निर्णय घेवूया. जो निर्णय होईल, त्याबरोबरच मी राहिन, असा शब्द डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी कार्यकर्त्यांना नेसरीत झालेल्या मेळाव्यात दिला.

Take four days, sit together and make a decision: Nandini Babulakar | चार दिवसांचा वेळ द्या, एकत्र बसून निर्णय घेवू :  नंदिनी बाभूळकर

चार दिवसांचा वेळ द्या, एकत्र बसून निर्णय घेवू :  नंदिनी बाभूळकर

Next
ठळक मुद्देचार दिवसांचा वेळ द्या, एकत्र बसून निर्णय घेवू :  नंदिनी बाभूळकरनेसरीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला फेरविचाराचा शब्द

गडहिंग्लज : राजकारणाच्या पलिकडे कार्यकर्त्यांशी आपले नाते आहे. त्यांच्या भावनांचा अनादर करण्याच पाप कधीच करणार नाही. विचार करायला चार दिवसांचा अवधी द्या, सर्वजण एकत्र बसूनच निर्णय घेवूया. जो निर्णय होईल, त्याबरोबरच मी राहिन, असा शब्द डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी कार्यकर्त्यांना नेसरीत झालेल्या मेळाव्यात दिला.

चार दिवसापूर्वी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आपण व नंदाताईदेखील यावेळी निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय अचानकपणे जाहीर केल्यामुळे चंदगड मतदारसंघात तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वत:हून मेळावा भरवून आपल्या भावना मांडल्या. यावेळी नंदातार्इंचे पती डॉ. सुश्रूत बाभूळकर हेदेखील आवर्जून उपस्थित होते.

तालुकाध्यक्ष रामाप्पा करिगार म्हणाले, कुपेकरांच्यामुळे मोठे झालेले विरोधात गेले तरीही निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे संघटना अभेद्य राहिली. कुपेकरांचा विचार व वारसा पुढे नेण्यासाठी नंदातार्इंनी फेरविचार करावा. ‘गोकुळ’चे संचालक रामराज कुपेकर म्हणाले, नंदातार्इंच्या उमेदवारीला विरोध करणारे एव्हीएच विरोधातील लढाईत कुठे होते?

उदय जोशी म्हणाले, स्व. कुपेकरांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नंदातार्इंनी पुढे यावे. यावेळी महाबळेश्वर चौगुले, दीपक जाधव, बी. डी. पाटील, तानाजी शेंडगे, रघुनाथ पाटील, ज्ञानप्रकाश रेडेकर, संभाजी पाटील, अनिता भोगण, विद्या पाटील, दत्तू विंझणेकर, गणेश फाटक, रामलिंग पाटील, तजमल फणीबंद, बबन देसाई, राजू होलम, सुभाष देसाई, विकास मोकाशी, जुबेर काझी, जब्बार मुल्ला, आप्पासाहेब पाटील, शंकर कांबळे, सिकंदर नाईक, सदानंद पाटील, बाबासाहेब पाटील, नामदेव निट्टूरकर, नामदेव पाटील, भैरू खांडेकर, बाबासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दशरथ कुपेकर यांनी प्रास्ताविक केले. जयसिंग चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले. अभिजीत पाटील यांनी आभार मानले.

कुणाकडूनही लढा, पण लढा..!

नंदातार्इंनी फेरविचार करावा आणि निवडणूक लढवतो असे जाहीर करावे. त्यांनी कुठल्याही पक्षाकडून लढावे. परंतु, निवडणूक लढवावी. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशीच भावना बहुतेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीसंदर्भातील निर्णयाचे सर्वाधिकारही नंदातार्इंनाच देण्यात आले. व्यासपीठावर पक्षाचा बॅनरदेखील न लावता झालेल्या मेळाव्याला चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कुणाचाही दबाव नाही !

सासऱ्यांनी शून्यातून विश्व निर्माण केल्यामुळे आपल्याला ‘ईडी’ची भिती नाही. आपल्यावर कुणाचाही दबाब नाही, असे स्पष्ट करतानाच अत्यंत कठीण काळात बंधू रामराज आणि जीवाभावाच्या कार्यकर्त्यांमुळेच आपण आर्इंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा बाबांना मृत्यूसमयी दिलेला शब्द पाळू शकले, असे सांगून नंदातार्इंनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

 ‘राष्ट्रवादी’तूनच लढा !

शरद पवारांनीच बाबांना मोठ केलं, कठीण काळात त्यांची साथ सोडू नका, असे मसणू सुतार यांनी तर पुरोगामी विचार सोडू नका, राष्ट्रवादीतूनच लढा, अशी विनंती तालुकाध्यक्ष करिगार यांनी नंदातार्इंना हात जोडून केली.


 

Web Title: Take four days, sit together and make a decision: Nandini Babulakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.