अंबाबाईचे गाभाऱ्यातून दर्शन घेणार

By admin | Published: April 3, 2016 03:50 AM2016-04-03T03:50:02+5:302016-04-03T03:50:02+5:30

आंदोलनाचे लोण कोल्हापुरात : ‘अवनी’च्या अनुराधा भोसले यांनी पोलिसांना दिले पत्र

To take a glimpse from Ambabai's house | अंबाबाईचे गाभाऱ्यातून दर्शन घेणार

अंबाबाईचे गाभाऱ्यातून दर्शन घेणार

Next

कोल्हापूर : शनि शिंगणापूर येथे शनि चौथऱ्याचे दर्शन घेण्यासाठी महिलांनाही प्रवेश देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत म्हणून कोल्हापुरातही पुरोगामी विचारांच्या महिला उद्या, सोमवारी सकाळी अकरा वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करून देवीचे दर्शन घेतील, अशी माहिती ‘अवनि’च्या अनुराधा भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना शनिवारी सायंकाळी दिली.
शनि शिंगणापूर येथील शनि चौथऱ्यावर महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने दर्शनासाठी प्रवेश द्यावा. या मागणीसाठी भूमाता महिला ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी प्रथम आंदोलन आणि नंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर न्यायालयाने जिथे पुरुषांना प्रवेश आहे त्या ठिकाणी महिलांनाही प्रवेश नाकारता येणार नाही, असा निकाल दिला. यावर देसाई यांनी शनिवारी शनि चौथऱ्यांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर गावकऱ्यांनी त्यांना रोखले. या पार्श्वभूमीवर ‘अवनि’ संस्थेच्या अनुराधा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी विचारांच्या महिला एकत्रित येऊन उद्या, सोमवारी सकाळी ११ वाजता देवीचे दर्शन गाभाऱ्यात जाऊन घेणार आहेत. यासंदर्भात पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: To take a glimpse from Ambabai's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.