एक गाव एक गणपतीसाठी पुढाकार घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:30 AM2021-08-25T04:30:25+5:302021-08-25T04:30:25+5:30
प्रयाग चिखली : एक गाव एक गणपतीसाठी गावचे सरपंच व पोलीस पाटील यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करवीरचे पोलीस ...
प्रयाग चिखली : एक गाव एक गणपतीसाठी गावचे सरपंच व पोलीस पाटील यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी केले. आंबेवाडी येथे गणेश उत्सवानिमित्त सरपंच व पोलीस पाटील यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. पोलीस निरीक्षक कोळेकर पुढे म्हणाले की कोल्हापूरचा गणेशोत्सव हा महाराष्ट्रात कोल्हापूरचा लौकिक वाढवणारा आहे. त्यामुळे त्या लौकिकाला साजेशा पद्धतीनेच गणेश उत्सव साजरा करण्यात यावा. महापूर, कोरोनामुळे तरुण मंडळांनी वर्गणीसाठी लोकांना वेठीस धरू नये. चार फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तीवर भर द्यावा. यावेळी एस. आर. पाटील, सिकंदर मुजावर, भिकाजी पाटील, संग्राम भापकर यांच्यासह ३0 गावचे सरपंच तर ५0 गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.