सिंह राशीतील उल्कावर्षावाचा आज रात्री बारा वाजता घ्या अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 08:33 PM2017-11-17T20:33:14+5:302017-11-17T20:46:18+5:30
अवकाशातील आतषबाजी पहायची असेल, तर आज रात्री तशी संधी आली आहे. सिंह राशीतील उल्का वर्षाव पाहण्याचा खगोलप्रेमींसह सर्वसामान्यांनाही संधी मिळणार आहे. १७ नोव्हेंबरच्या रात्री आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव होणार आहे. ही अनोखी घटना साध्या डोळ्यांनीही पाहायला मिळणार आहे.
कोल्हापूर : अवकाशातील आतषबाजी पहायची असेल, तर आज रात्री तशी संधी आली आहे. सिंह राशीतील उल्का वर्षाव पाहण्याचा खगोलप्रेमींसह सर्वसामान्यांनाही संधी मिळणार आहे.
१७ नोव्हेंबरच्या रात्री आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव होणार आहे. ही अनोखी घटना साध्या डोळ्यांनीही पाहायला मिळणार आहे. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पूर्वक्षितिजावर सिंह रास उगवताच पहाटेपर्यंत उल्का वर्षाव पहायला मिळणार आहे. तासाला १५ ते २० उल्कांचा वर्षाव होताना अनुभवायला मिळेल. अमावस्येची रात्र असल्याने काळोखात होणारी ही आतषबाजी आणखीनच नयनरम्य दिसणार आहे.
टेम्पल टटल धूमकेतू
या दिवशी पृथ्वी टेम्पल टटल या धूमकेतूचा मार्ग (कक्षा) ओलांडून जाणार असल्यामुळे हा उल्कावर्षाव घडणार आहे. हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी सूर्यमालेत येऊन सूर्याला फेरी मारून जात असतो. त्यावेळी धुमकेतुमधील काही द्रव्य त्याच्या मार्गावर ओसंडून जातात, त्यालाच अवकाशातील कचरा ( डेबरीज) असे म्हणतात.
जेंव्हा पृथ्वी या भागातून पुढे जात असते तेंव्हा गुरुत्वाकर्षणामुळे हा कचरा पृथ्वीकडे खेचला जातो आणि वातावरणाशी घर्षण होऊन तो पेट घेतो, तेंव्हा आकाशात एक लखलखीत प्रकाश शलाका चमकून जाते. काहीवेळेस मोठमोठे अग्निगोलसुद्धा दिसण्याची शक्यता आहे. या आतषबाजीमुळे पृथ्वीवासीयांना नभांगणात नयनरम्य रोषणाई पाहायला मिळणार आहे.
धूमकेतूचा हा कचरा अंतराळात सिंहराशीच्या दिशेत असलेने या उल्का सिंह राशीतून पडत आहेत असे भासते. म्हणूनच या खगोलीय अविष्कारास लिओनीड्स- म्हणजे सिंह राशीतील उल्कावर्षाव असे म्हणतात. इतर राशिंमधूनही वर्षभरात लहान-मोठे वर्षाव होतच असतात. त्यांतील काही प्रेक्षणीय असतात . उदा. जेमिनिड, परसुअस त्यांप्रमानेच लिओनीड्स हा एक आहे.
कोठे घ्यावा उल्का वर्षावाचा आनंद ?
उल्कावषार्वाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी शहरापासून थोडे दूर, एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावर, अंधाºया ठिकाणी गेल्यास हा वर्षाव अतिशय सुस्पष्ट दिसेल. आपल्या घराच्या गच्चीवरुन किंवा विस्तीर्ण मैदानावरूनही हा उल्कापात पाहता येतो. शकता, पण तेथून संपूर्ण अवकाश दिसायला हवे. अशा ठिकाणी चटई अंथरून त्यावर पडून निवांत निरिक्षण करण्याचाही आनंद लुटता येईल.
आपली नजर पूर्व दिशेला उगवणाºया सिंह राशिकडे ठेवावी. कोणत्याही उपकरणाशिवाय केवळ साध्या डोळ्यांनी निरीक्षणाचा आनंद घेता येणार आहे. खगोलप्रेमी असाल तर या उल्कापाताच्या नोंदीही घेता येणार आहे. एखाद्या खगोल तज्ञ व्यक्तीसोबत हा उल्का वर्षाव पाहिल्यास आकाशातील नक्षत्र, राशी, तारका समूहांची माहितीही करून घेता येईल. यामुळे अवकाश निरीक्षणाचा आनंद द्विगुणित होणार आहे.
नक्षत्र आणि त्यातून होणारे उल्कावर्षाव
नक्षत्र : क्वाड्रंटिड्स
काळ : डिसेंबर २८ ते जाने. ७ जानेवारी ३
ताशी : ४५ ते २००
रंग : निळसर
नक्षत्र :अॅक्वेरिड्स
काळ : एप्रिल २१ ते मे १२ ,मे ५ ते ६
ताशी : २०
नक्षत्र : लायरिड्स
ताशी : एप्रिल १६ ते २५
सर्वाधिक : एप्रिल २२
ताशी : १०
वेग : वेगवान
नक्षत्र : डेल्टा अॅक्वरिड्स
काळ : जुलै १४ ते आॅगस्ट १८
सर्वाधिक : जुलै २८ ते २९
ताशी : १५ ते २०
नक्षत्र : पर्सिड्स
काळ : जुलै २३ ते आॅगस्ट २२
सर्वाधिक : आॅगस्ट १२
ताशी : ८०
वेग : वेगवान
नक्षत्र : आयोटा अॅक्वेरिड्स
काळ : आॅगस्ट ११ ते सप्टें. १०
सर्वाधिक : आॅगस्ट १ ते २
ताशी : १०
वेग : तेजस्वी संथ
नक्षत्र : कॅप्रिकॉर्निड्स
काळ : जुलै १५ ते सप्टें. ११
सर्वाधिक : आॅगस्ट १ ते २
ताशी : १०
वेग : तेजस्वी संथ
नक्षत्र : ओरायनिड्स
काळ : आॅक्टो. १५ ते २९
सर्वाधिक : आॅक्टो. २१ ते २२
ताशी : २०
वेग : वेगवान
नक्षत्र : लिओनिड्स
काळ : नोव्हे. १४ ते २०
सर्वाधिक : नोव्हे. १७ ते १८
ताशी : १५०
२०३१ मध्ये वाढण्याची शक्यता
नक्षत्र : जेमिनिड्स
काळ : डिसें. ६ ते १९
सर्वाधिक : डिसें. १३
ताशी : ८०
वेग : वेगवान
रंग : पिवळसर