नव्या वर्षात विमानसेवेचा ‘टेक आॅफ’
By admin | Published: August 19, 2016 12:58 AM2016-08-19T00:58:18+5:302016-08-19T00:58:18+5:30
चंद्रकांतदादा यांची माहिती : उड्डाण परवाना, नाईट लँडिंगसाठी पाठपुरावा करणार
कोल्हापूर : विमान उड्डाण परवान्याचे नूतनीकरण, नाईट लँडिंगचा परवाना मिळविण्यासाठी येत्या आठ दिवसांत केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्र्यांच्याकडे बैठक घेऊन पाठपुरावा केला जाईल. याबाबतची सर्व कार्यवाही येत्या तीन महिन्यांत पूर्ण करून दि. १ जानेवारीपासून कोल्हापूर-मुंबई अशी विमानसेवा कोल्हापूरकरांच्या सेवेत राज्य सरकारकडून रूजू केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली.
कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण आणि विमानसेवा प्रारंभाबाबतच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी मंत्रालयात संयुक्त बैठक घेतली. यावेळी खासदार राजू शेट्टी, खासदार युवराज संभाजीराजे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सैनी, करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील, केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीतील निर्णयाबाबत मंत्री पाटील यांनी सांगितले की, वनविभागाची जमीन संपादनाबाबतचा ‘ना हरकत ठराव’ गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लागणारी ११ हेक्टर वनखात्याची जमीन मिळणार आहे. या जमिनीचा मोबदला महाराष्ट्र विमान विकास महामंडळ देणार आहे तसेच साडेपाच हेक्टर खासगी मालकीची जमीन ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित जमीन मालकांना रेडिरेकनर दराच्या पाचपट अधिक मोबदला देण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०१४ मध्ये कोल्हापूरचा नागरी वाहतुकीचा(पान ८ वर)
दिल्लीत बैठक
घेण्यास प्रयत्नशील
कोल्हापुरातील विमानसेवा प्रारंभाबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. ते म्हणाले, विमान उड्डाण परवान्याचे नूतनीकरण, नाईट लँडिंगच्या परवान्यासह अन्य अडचणी सोडविण्याबाबत केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांना बैठक घेण्याची विनंती करणार आहे. त्यासाठी सोमवारनंतर दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहे. विमानसेवेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल.