विमानतळ रस्त्याप्रश्नी आठवड्यात बैठक घेऊ: जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 06:57 PM2019-03-05T18:57:08+5:302019-03-05T18:58:39+5:30
उजळाईवाडी येथील विमानतळ विस्तारीकरणामध्ये समाविष्ट असलेल्या नेर्ली,तामगाव, उजळाईवाडी या मार्गाला पर्यायी मार्गाचा विचार व्हावा या मागणीवह विविध प्रश्नांसंदर्भात आठड्यात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी उजळाईवाडी-कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील विमानतळ विस्तारीकरणामध्ये समाविष्ट असलेल्या नेर्ली,तामगाव, उजळाईवाडी या मार्गाला पर्यायी मार्गाचा विचार व्हावा या मागणीवह विविध प्रश्नांसंदर्भात आठड्यात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी उजळाईवाडी-कोल्हापूरविमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी देसाई यांना निवेदन दिले. यावेळी आ. सतेज पाटील व कृती समितीचे अध्यक्ष नारायण पोवार म्हणाले, नेर्ली, तामगाव, उजळाईवाडी हा रस्ता विस्तारीकरणासाठी समाविष्ट झाला आहे. याला पर्यायी मार्ग हा गोकुळ शिरगावच्या हद्दीतील जमिनीच्या काही गटांमधून देण्यात आला आहे. हा रस्ता अव्यवहार्य आहे. कारण पुणे-बेंगलोर महामार्ग क्रमांक ४ वर गोकुळ शिरगाव हद्दीत कोंडुस्कर पेट्रोल पंप व सुदर्शन पेट्रोल पंप यांच्यामध्ये निघतो.
हा मार्ग ज्या ठिकाणी महामार्गाशी संलग्न होतो. तेथून कोल्हापूरकडे जाण्याकरीता मयूर पेट्रोल पंपाच्या भुयारी मार्गापर्यंत विरुध्द व चुकीच्या दिशेने ७०० मीटरपर्यंत गोकुळ शिरगावकडे जाताना ओढ्याच्या सेवा रस्त्यावरील पुलावरुन जाणारा आहे.
हा पुल जुना ब्रिटीशकालिन असून त्याची वैधताही संपली आहे. तसेच त्याचा आकार हा वक्राकार असल्याने व उंचीची वाहने येथून जाऊ शकत नसल्याने ते त्रासदायक होणार आहे. त्यामुळे नेर्ली, तामगाव रस्ता व गोकुळ शिरगाव हद्दीत मयूर पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्ग जोडून मिळावा.
यावर जिल्हाधिकारऱ्यांनी आठवड्यात बैठक घेऊन या प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न करु असे सांगितले. तसेच या प्रशनावर संबंधित अभियंत्याशीही चर्चा करु असेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर विमानळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्याने नोकरी द्यावी, शेतकऱ्यांना विमानतळ प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा अशा विविध मागण्यांबाबत चर्चा झाली.
यावेळी समितीचे निमंत्रक राजू माने, प्रकाश् पाटील, तम्मा शिरोळे, सर्जेराव मिठारी, भैरु केसरकर, शशिकांत खोत, मोहन खोत, संजय चौगले, हंबीरराव पाटील, अजित पाटील, शितल खोत, मधुकर कांबळे, यांच्यासह नेर्ली,तामगाव, हालसवडे, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.