केएमटी सेवानिवृत्तांच्या देय रकमांप्रश्नी बैठक घेऊ -संजय सरनाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 05:19 PM2018-11-19T17:19:49+5:302018-11-19T17:25:19+5:30
सेवानिवृत्त केएमटी कर्मचाºयांच्या देय रकमांप्रश्नी या आठवड्यात बैठक घेऊ, असे आश्वासन प्रभारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांनी सोमवारी दिले. सेवानिवृत्त कर्मचाºयांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली टेंबे रोड येथून महापालिकेवर मोर्चा
कोल्हापूर : सेवानिवृत्त केएमटी कर्मचाºयांच्या देय रकमांप्रश्नी या आठवड्यात बैठक घेऊ, असे आश्वासन प्रभारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांनी सोमवारी दिले. सेवानिवृत्त कर्मचाºयांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली टेंबे रोड येथून महापालिकेवर मोर्चा काढला. त्यावेळी ते महापालिकेजवळ बोलत होते.
सेवानिवृत्त कर्मचाºयांना १९९८ पासून वाढीव महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर पूरक भत्ता व पाचव्या आयोगाच्या शिफारशीप्रमाणे फरकाच्या रकमा ८७ कामगारांना अदा कराव्यात म्हणून असा आदेश औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. तथापि, देय रकमा केएमटी प्रशासनाने दिलेल्या नाहीत. यासाठी परिवहन सभापती राहुल चव्हाण, काही नगरसेवक यांना भेटले; पण रकमा देण्याबाबत आयुक्तांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.
या रकमा मिळाव्यात, यासाठी केएमटी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी सोमवारी सकाळी मोर्चा काढला.
बिंदू चौक, शिवाजी चौक मार्गे महापालिका मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा मोर्चा आला. त्या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली. जोपर्यंत प्रशासन रकमा देणार नाही, तोपर्यंत येथून न हलण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी संजय सरनाईक प्रवेशद्वाराजवळ आले. त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाºयांबरोबर चर्चा केली. ते म्हणाले, सर्वांच्या रकमा दिल्या जातील.
हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. याचे लेखी पत्र मी तुम्हाला देतो. तीन महिन्यांपूर्वी महापालिका प्रशासनाने सेवानिवृत्त केएमटी कर्मचाºयांना ६० लाख रुपये दिले आहेत. याबाबत आयुक्तांशी चर्चा करून बैठक घेऊ, तसे लेखी पत्र देऊ, असे आश्वासन सरनाईक यांनी यावेळी दिले. यावर या आठवड्यात बैठक घ्या, असे सेवानिवृत्त कर्मचाºयांनी त्यांना सांगितले.मोर्चात बाबूराव कदम, सुभाष सावंत, संभाजीराव जगदाळे, कुमार जाधव, श्रीकृष्ण कुंभार, दस्तगीर पकाले, अशोक नाईक, सुशांत बोरगे, मधुकर हरेल, अस्लम बागवान, आदींचा सहभाग होता.