एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा त्वरित घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:48+5:302021-07-05T04:16:48+5:30
कागल - कोरोनाच्या नावाखाली एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा राज्य सरकारने त्वरित घ्याव्यात अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ...
कागल - कोरोनाच्या नावाखाली एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा राज्य सरकारने त्वरित घ्याव्यात अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकार एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत कोणतेही ठोस धोरण जाहीर करण्यास तयार नाही.त्यामुळे या परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. परीक्षाची तयारी करण्यासाठीचा खर्च आता पेलवेना झाला आहे. शिवाय वयोमर्यादेच्या अटींमुळे भवितव्य अंधकारमय होण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या तयारीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सहनशक्तीचा अंत न बघता राज्य सरकारने या परीक्षांचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे.
चौकट
● स्वप्निलच्या आत्महत्येस जबाबदार कोण.?
एमपीएससीमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करा. असे न्यायालयीन आदेश असतानासुद्धा राज्य शासनाने या नियुक्त्या केलेल्या नाहीत. असे २१८५ विद्यार्थी हक्काच्या नोकरीपासून वंचित आहेत. परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा दोन वर्षे न्यायासाठी झगडत आहेत. यासाठी कालच स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. याला जबाबदार कोण असेही समरजित घाटगे यांनी म्हटले आहे.